किणी वडगाव येथील जबरी चोरीचा गुन्हा "12 तासात उघड" सात आरोपी ताब्यात
schedule23 Dec 25 person by visibility 86 categoryगुन्हे
कोल्हापूर : किणी वडगाव येथील जबरी चोरीचा गुन्हा "12 तासात उघड" होऊन सात आरोपी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 60 किलो चांदी 10 ग्रॅम सोने व मशनीरीचे स्पेअर पार्ट असा एकूण 1,22,15,000/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.
तक्रारदार मछिंद्र नामदेव बोबडे वय 47, रा. सवित्री प्लाझा भेंडे गल्ली शिवाजी चौक कोल्हापुर हे दशरथ शामराव बोबडे यांचे मालकीच्या न्यु अंगडीया सर्विस मध्ये कोल्हापूर ते मुंबई पार्सल ने आण करण्याचे काम करीत असतात. दि. 22 डिसेंबर रोजी रात्री 11.00 वा चे सुमारास अशोक ट्रॅव्हल क्र एम एच 09 जी जे 7272 या गाडीतुन 60 किलो चांदी व 10 ग्रॅम सोने व मशनरीचे स्पेअर पार्ट असे तीन पार्सल घेवुन कोल्हापूरातुन मुंबई करीता निघाले होते. त्यावेळी तावडे हॉटेल येथे तिघेजण गाडी मध्ये चढले त्यांनतर ते वाठार येथे गाडी आलेनंतर मागील सीट वरून पुढे ड्रायव्हर केबीन मध्ये येवुन बसले. त्यानंतर त्यां केबीन मध्ये बसलेल्या एका व्यक्तीने बॅगेतील कोयता काढून तो गाडीच्या क्लिनरच्या मानेला लावुन चालकाला गाडी थांबविण्यास सांगीतले त्यानंतर इतर व्यक्तीने फिर्यादी व क्लिनरला मारहाण करून खाली उतरवले. त्यावेळी बाकीच्या साथीदारानी दुचाकी वाहनावरुन येवुन फिर्यादीकडुन जबरदस्तीने फिर्यादीची 60 किलो चांदी 10 ग्रॅम सोने व मशनीरीचे स्पेअर पार्ट असा मुद्देमाल कोयत्याचा धाक दाखुवन काढून घेवुन पळुन गेले . फिर्यादीवरून वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करणेत आला होता.
या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक , आण्णासाहेब जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व वडगाव पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी भेट दिली. पथकाने गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देवून गुन्ह्याचे ठिकाणची पाहणी व आसपासचे परिसराची पाहणी करून तपास सुरु केला.
कोल्हापूर बस स्टैंड ते गुन्हा घडले ठिकाणी किणी या गावापर्यंत असणा-या सर्व सीसीटीव्ही कॅमे-यांची पाहणी करुन गुन्हा घडले ठिकाण व गुन्हा घडणेची प्रक्रियाची माहिती घेत असताना सदरचा गुन्हा हा गुन्हा घडले ठिकाणी परिपुर्ण माहिती असणारे इसमानेच केला असावा असा प्राथमिक अंदाज घेवून या गुन्हयाचा तपास करीत असताना तपास पथकातील अधिकारी व अमंलदार यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा अक्षय कदम रा. विक्रमनगर कोल्हापूर याने व त्याचे साथीदाराने मिळुन केला असून जबरी चोरी करून चांदी व इतर मुददेमाल घेवुन तो त्याचे विक्रमनगर मधील घरी असलेची गोपनिय माहिती मिळाली. त्यानंतर तपास पथकातील पथक त्याचे घरी जावून अक्षय कदम यास ताब्यात घेतले व त्याचे घडले गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. अक्षय कदम याचे राहते घराची झडती घेतली असता त्याचे घरामध्ये जबरी चोरी केलेली 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोने, मोबाईल हँडसेट व मशनरीचे स्पेअर पार्ट मिळून आला सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेतला. त्यानंतर अक्षय कदम यास त्याचे पुर्ण नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अक्षय बाबासाहेब कदम वय 31 रा. विक्रमनगर 3 रा. बस स्टॉप कोल्हापुर असे सांगितले. आज रोजी आंम्ही साथीदार चोरलेल्या मुद्देमालाचे अनुषंगाने टेंबलाई मंदिर येथे भेटणार आहोत असे सांगितलेने त्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाने टैबलाई मंदीर येथे सापळा रचुन अक्षय कदम याचे साथीदार 1) जैद बशीर अफगाणी वय 21 रा. मदीना कॉलनी, उचगांव कोल्हापूर 2) अमन लियाकत सय्यद वय 21 रा. 2 रा बस स्टॉप शेजारी, विक्रमनगर कोल्हापूर 3) सुजल प्रताप चौगले वय 20 रा. आकाशवाणी रोड, सांगली 4) आदेश अरविंद कांबळे वय 18 रा. आकाशवाणी रोड, सांगली 5) अदिनाथ संतोष विपते वय 25 रा. आकाशवाणी रोड, सांगली, 6) सैफू बशीर अफगाणी रा मदिना कॉलनी, उंचगाव, कोल्हापूर (क्लीनर) यांना ताब्यात घेतले असता त्यांनी सुध्दा गुन्हयाची कबुली दिलीने त्यांना पुढील तपास कामी वडगाव पोलीस ठाणे येथे जमा केले असुन पुढील तपास वहगाव पोलीस ठाणे करवी सुरु आहे.
सदर आरोपी यांनी सदरचा गुन्हा हा आपले चैनी करीता व कर्जबाजारी असलेने केला असले बाबत प्राथमिक तपासामध्ये निष्पण झाले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, योगेश कुमार गुप्ता साो, मा.अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेबत जाधव , उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, जालींदर जाधव व पोलीस अमंलदार, हिंदुराव केसरे, संजय कुंभार, वैभव पाटील, रोहित मर्दाने, वसंत पिंगळे, शुभम संकपाळ, युवराज पाटील, संदीप पाटील, अमित सर्जे, अरविद पाटील, शिवांनद मठपती, विशाल चौगले, सचिन जाधव, अनिकेत मोरे, गजानन गुरव, संतोष बरगे, सत्यजित तानुगडे, विशाल खराडे, राजेश राठोड, सुशिल पाटील यांनी केली आहे.





