निवडणुक कामगीरीसाठी गैर हजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर फौजदारी कारवाई
schedule19 Dec 25 person by visibility 79 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस सर्व नियंत्रण अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.
यानंतर प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रशासकांना असे निदर्शनास आले की निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचा-यांपैकी बरेचसे कर्मचारी अद्याप हरज झालेले नाहीत. त्यामुळे भरारी पथक (FST), स्थिर पथक (SST) तसेच व्हिडीओ पडताळणी पथक (VST) व निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामगिरीसाठी शनिवार, दि. 20 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अनिवार्यपणे हजर राहावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. जे कर्मचारी हजर होणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
निवडणूक कामगिरीस गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उद्या हजर झाले नाही तर फौजदारी कारवाई करण्यात यावी, असे आदेश प्रशासकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. तसेच निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सर्व संबंधितांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, निवडणुक निर्णय अधिकारी संदीप भंडारे, एकनाथ काळबांडे, शक्ती कदम, सुशिल संसारे, हरेश सुळ, समीर शिंगटे, श्रीमती रुपाली चौगुले, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, निवडणूक अधिक्षक सुधाकर चल्लावाड, उपस्थित होते.





