शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त; कोल्हापुरातील निवासस्थानी सांत्वनासाठी गर्दी
schedule07 Aug 26 person by visibility 154 categoryसामाजिक
कोल्हापूर : शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी शोक व्यक्त करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची रीघ लागली होती. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी पाटील कुटुंबाची भेट घेत दुःखात सहभागी होत सांत्वन केलं. शुक्रवारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. संजय डी. पाटील,आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील व कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, डी वाय दादांनी शिक्षण व सामाजिक क्षेत्रात प्रचंड मोठे कार्य उभे करून आपल्या विचारांचा वारसा मागे ठेवला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाची उणीव सतत भासेल.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले म्हणाले, राज्याच्या शिक्षण क्षेत्रात डॉ. डी वाय पाटील यांचे फार मोठे योगदान आहे. सर्व सामन्यांच्या मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी शिक्षण संस्थांचे जाळे उभे केले. राजर्षी शाहू महाराजांचा शिक्षण क्षेत्रातील वारसा त्यांनी समर्थपणे पुढे नेला.
शशिकांत शिंदे म्हणाले, डॉ. डी. वाय. पाटील यांनी कोल्हापूरच्या मातीतून देशभर शिक्षणाची क्रांती घडवली. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांचे कार्य समाजासाठी कायम प्रेरणादायी राहील.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे म्हणाले, दादा हे सर्वांना आपलेसे वाटणारे, आदरणीय आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी अनेकांना दिशा दिली. त्यांच्या जाण्याने राज्याने एक मोठा आधारवड गमावला आहे.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, दादासाहेब हे सहृदयी संवेदनशील व्यक्तिमत्व होते. सर्वांचे सुख दुःखात हे सहभागी असायचे. त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून सर्व सर्वसामान्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. माझ्या आजोबा माझी खासदार स्वर्गीय बाळासाहेब माने यांच्याशी त्यांचे अतिशय मैत्रीचे संबंध होते. त्यांच्या निधनाने राज्याची व देशाची मोठी आणि झाली आहे.
आमदार अरुण लाड यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण, शेती आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव करत त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे सांगितले.
अभिनेते रितेश देशमुख, माजी केंद्रीयमंत्री प्रतिक पाटील, भाकपचे राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड डी राजा, भाकपचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कान्गो, भाकप राज्य सेक्रटरी सुभाष लांडे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार धैर्यशील कदम, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार धीरज देशमुख, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार सदाशिव पाटील, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार संपतबापू पाटील, माजी आमदार हुस्नबानू खलिफे,सरोज माई पाटील,विजया पाटील, बुधाजीराव मुळीक,स्मृती सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे, देविदास भन्साळी, मुरलीधर जाधव , स्मिता पानसरे, भाकपचे सतीशचंद्र कांबळे, गिरीश फोंडे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सहसंघटन मंत्री देवदत्त जोशी आरएसएसचे भगत छापडा, आमदार अनिकेत देशमुख, मंगल महादेवराव महाडिक, भाजप महिला अध्यक्षा शौमिका महाडिक, पी. एस. पाटील, आनंदनाथ महाराज सांगवडेकर, निरंजन महाराज सांगवडेकर, व्ही बी पाटील, संजय पाटील यड्रावकर, शंकर पाटील, अनिल पाटील, विक्रांत पाटील किणीकर, मधुकर भावे, कर्ण गायकवाड, रणजीत के पी पाटील, बी एस पाटील (कुर), फिरोजखान पाटील, कोल्हापूर फर्स्टचे सुरेंद्र जैन, आण्णासाहेब चकोते, शिरोळ नगराध्यक्षा योगीत कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव सर्व नगरसेवक, प्रवीणसिंह पाटील (मुरगुडकर) मुरगुड नगराध्यक्षा सुहासिनी पाटील व सर्व नगरसेवक, मार्केट कमिटी चेअरमन नाना कांबळे व संचालक, सहकार बारचे अध्यक्ष के व्ही पाटील व संचालक, शेतकरी संघाचे अध्यक्ष ॲड दतात्रय राणे, अर्बन बँक संचालक मंडळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पाटील कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.