आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धेत डी. वाय. पाटील आर्किटेक्चरला उपविजेतेपद
schedule27 Feb 25 person by visibility 331 categoryक्रीडा

कोल्हापूर : पुणे येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे झालेल्या आंतर आर्किटेक्चर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या संघाने उपविजेतेपद मिळवले. भारती विद्यापीठ विरुद्धच्या अंतिम सामन्यात गोल शून्य बरोबरी झाल्याने पेनल्टी शूटआऊटवर ४-३ असा निसटता पराभव स्विकारावा लागला.
स्पर्धेमध्ये स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या सिद्धराज डोंगरे, शिवम कुंभार, ओम सुतार,अनिश पवार, श्रेयस खवरे, वेदांत खारशिंगे, रितेश कोरवी, पुष्कर मालगावकर, आदित्य गवळी, देवाशिष सरनोबत, यश कुमार डफळे, आर्यन खवाटे अथर्व जाधव, सुजल हळदे, अविराज सुपाते, प्रज्वल जाधव या खेळाडूंनी सहभाग घेतला.
महाविद्यालयाच्या आर्यन खवाटे सर्वोत्तम खेळाडूचा तर सुजल हळदे सर्वोच्च स्कोररचा मानकरी ठरले. या विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर विभाग प्रमुख प्रा. इंद्रजीत जाधव, डीन स्टुडंट्स अफेयर्स डॉ. राहुल पाटील व क्रीडा समन्वयक प्रा. कृष्णाली पाटील यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष कुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.