SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल राखून ठेवलेल्या व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देशनिवडणूक आयोगाकडून बीएलओ आणि पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढकाँग्रेस कमिटी मेळावा : राहुल आणि राजेश पाटील यांची भूमिका, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यासाठी दुर्दैवी; मात्र शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही काँग्रेस पक्ष आणि आमदार सतेज पाटील यांच्यासोबत; कार्यकर्त्यांनी मेळाव्यात व्यक्त केल्या तीव्र भावनाडी. वाय. पाटील अभियांत्रिकीला स्कॉलर विद्यार्थ्यांची पसंतीसंकेश्‍वर ते आंबोली महामार्गावर गडहिंग्लज आणि आजरा गावांना बायपास रस्ता करावा, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणीकागलचे उपनगराध्यक्ष प्रविण काळबर यांच्या वाढदिवसानिमित्त एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धा : श्रीराज, ऋषिकेश, प्रेम, अर्णव आघाडीवरमहादेवीच्या घरवापसीसाठी आ.सतेज पाटील यांचा पुढाकार; सव्वा दोन लाखांहून अधिक नागरिकांच्या स्वाक्षरीकसाबा बावडा येथील राजर्षी शाहू विद्यामंदिरात एक राखी सीमेवरील जवानांसाठी उपक्रम उत्साहात डीकेटीईच्या सिव्हील मधील समिक्षा पाटील हिची बृहमुंबई येथे शासकीय सेवेत नोकरीसाठी निवडप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे गुणवंत विद्यार्थिनींचा गुणगौरव; गणवेश वाटप

जाहिरात

 

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीला स्कॉलर विद्यार्थ्यांची पसंती

schedule02 Aug 25 person by visibility 263 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : राज्य तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत (CAP-1) फेरीत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, क. बावडा, कोल्हापूर  महाविद्यालयाने स्कॉलर विद्यार्थ्यांची विशेष पसंती मिळवत प्रवेश प्रक्रियेत आघाडी घेतली आहे.

कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या शाखेसाठी ९७.०३% गुण मिळवणारी सृष्टी अनिल पाटील हिने प्रवेश घेतला आहे, तर ९६.४२% गुण मिळवणारी सई किरण माने हिने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात प्रवेश घेतला आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत अनेक उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयाची निवड केली आहे.

महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापकवर्ग, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रम यांमुळे डी. वाय. पाटील महाविद्यालय हे प्रवेशासाठी प्रथम पसंतीचे  ठरले आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील व विश्वस्त  ऋतुराज पाटील यांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्तेमुळेच  विद्यार्थ्यांची महाविद्यालयाला प्रथम पसंती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. 

 कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, १९८४ साली स्थापन झालेल्या या महाविद्यालयाला  एन. बी. ए. आणि नॅक कडून प्रतिष्ठित मानांकन प्राप्त झाले आहे. ही आमच्या शैक्षणिक उत्कृष्टतेची साक्ष आहे.यावर्षी आमच्या विद्यार्थ्यांची जसपे , इन्फोसिस, हेक्सावेअर, टेक महिंद्रा, आयसीबी लि. मुंबई, टोयो इंजिनिअरिंग इंडिया लि.
वाल्ट टेक्नॉलॉजीज, लूमिनस , रोटेक, फ्युचर टेक, भारत फोर्ज, वरली, विप्रो पारी यांसारख्या नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. काही विद्यार्थ्यांना २७ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. त्यामुळेच पहिल्या फेरीत महाविद्यालयाच्या सर्व शाखांना भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.

प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे म्हणाले, विद्यार्थ्यांचा व पालकांचा आमच्यावरचा विश्वास हेच आमच्या गुणवत्तेचं द्योतक आहे. येत्या काळातही  प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टता टिकवून ठेवू.

या वेळी रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, प्रवेशप्रक्रिया प्रमुख प्रा. आर. जी. बेन्नी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes