डीकेटीईच्या सिव्हील मधील समिक्षा पाटील हिची बृहमुंबई येथे शासकीय सेवेत नोकरीसाठी निवड
schedule02 Aug 25 person by visibility 159 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : डीकेटीईच्याछ सिव्हील इंजिनिअरींग विभागातील समिक्षा पाटील या विद्यार्थीनीला महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातातील बृहमुंबई महानगरपालिकेच्या सब इंजिनिअर पदी रु. १० लाख इतक्या वार्षिक वेतनावर नोकरीसाठी निवड झाली आहे. सब इंजिनिअर पद हे शासकीय सेवा क्षेत्रातील एक अत्यंत प्रतिष्ठतेची व स्थैर्यदायक संधी मानली जाते.
सिव्हील इंजिनिअरींग क्षेत्रात वाढती सरकारी नोक-यांची संधी लक्षात घेवून डीकेटीई संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शन सत्रे, कार्यशाळा व व्याख्याने आयोजित केली जातात. यामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळून स्पर्धा परिक्षेत यश मिळविण्यासाठी डीकेटीई एक मजबूत व्यासपीठ ठरत आहे.
संस्थेतील अदयायवत लायब्ररी, अत्याधुनिक सॉफ्टवेरर्स आणि तांत्रिक सुविधा विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षासाठी सक्षम बनवतात. याच बळावर, सिव्हील विभागाने प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश साध्य केले आहे, यावेळी संचालिका डॉ एल.एस.अडमुठे यांनी मत व्यक्त केली.
आजच्या स्पर्धात्मक युगात डीकेटीईचे विद्यार्थी मिळवत असलेले घवघवीत यश हे संस्थेच्या गुणवत्ता-केंद्रित शिक्षणाचा पुरावा आहे. डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची सरकारी सेवेत मोठया प्रमाणावर निवड व्हावी,यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशिल राहील,असा विश्वास संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी यावेळी व्यक्त केला.
या यशाबददल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, विभागप्रमुख ए.एल.मुल्ला यांचे मागदर्शन मिळाले.