SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलीमाजी सैनिकांच्या आरोग्यसेवेसाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटल कटिबद्ध : कुलगुरू कर्नल (नि.) डॉ राकेशकुमार शर्मा यांची ग्वाही कोरे अभियांत्रिकीच्या प्रा. शिल्पा पाटील यांना पीएच.डी. पदवी प्रदानघोडावत फौंडेशन तर्फे प्रीतम आनंद वृद्धाश्रमास मदतशिरोळ तालुका क्रीडा संकुलासाठी ५ कोटींचा निधी मंजूर; आमदार यड्रावकर यांचा पाठपुरावा ; आणखीन ५o कोटींचा प्रस्ताव कॅबिनेटकडे सादर राष्ट्रवादी भवन येथे ‘भारतीय संविधान दिन’ उत्साहात; २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजलीनिधीअभावी बंद पडलेले 'आपला दवाखाने' तात्काळ सुरू करा; अन्यथा आरोग्यमंत्र्यांची गाडी अडवूखेबवडेतील बुद्ध विहार पाणवट्याचा प्रश्न मार्गी; सागर भोगम यांनी दिलेला शब्द पाळला!लोकशाहीचा प्राणवायू: भारतीय संविधान दिन आणि डॉ. बाबासाहेबांचा अमूल्य वारसामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे महापौर रूपाराणी निकम यांचे निवेदन

जाहिरात

 

माजी सैनिकांच्या आरोग्यसेवेसाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटल कटिबद्ध : कुलगुरू कर्नल (नि.) डॉ राकेशकुमार शर्मा यांची ग्वाही

schedule26 Nov 26 person by visibility 119 categoryआरोग्य

◼️माजी सैनिकांसोबत हॉस्पिटलमध्ये  बैठक 

कोल्हापूर : देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अमूल्य वर्षे समर्पित करणाऱ्या माजी सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार, सुलभ व सन्मानपूर्वक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल कटिबद्ध असल्याची ग्वाही डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु कर्नल (नि.)डॉ. राकेश कुमार शर्मा  यांनी दिली.

कोल्हापूर जिल्हा सैनिक मंडळ समितीचे उपाध्यक्ष लेफ्टनंट कर्नल (नि.) विलास सुळकुडे  यांच्या नेतृत्वाखाली माजी सैनिकांनी डी. वाय. पाटील हॉस्पिटलला भेट देऊन माजी सैनिक व त्यांच्या  कुटुंबीयांसाठीच्या वैद्यकीय सुविधांबाबत रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी माजी सैनिकांना आरोग्यसेवा घेताना येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि रुग्णालय व सैनिक मंडळ यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्याबाबत चर्चा झाली.

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल आणि इ.सी.एच.एस. पॉलीक्लिनिक  यांच्यामध्ये यापूर्वीच सामंजस्य करार  झालेला आहे. या कराराच्या माध्यमातून माजी सैनिकांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासन निश्चितच सहकार्य करेल असे यावेळी डॉ. शर्मा यांनी सांगितले.

या चर्चेदरम्यान माजी सैनिकांच्या रेफरल प्रक्रियेत प्राधान्याने सहकार्य, नोंदणी व वैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक मार्गदर्शन, गंभीर आजारांच्या रुग्णांना तातडीने उपचार, प्रयोगशाळेतील तपासण्यांना प्राधान्य, तसेच एम.आर.आय, एक्स-रे यांसारख्या तपासण्यांसाठी स्वतंत्र वेळ निश्चित करणे या विषयांवर चर्चा झाली. याशिवाय वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी, आवश्यक वैद्यकीय कागदपत्रांच्या छायांकित प्रती उपलब्ध करून देणे आणि माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी रुग्णालयात बैठक व्यवस्था याबाबतही सूचना करण्यात आल्या. माजी सैनिकांच्या उपचार प्रक्रियेत अनावश्यक विलंब होऊ नये आणि त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यावर विशेष भर देण्यात आला. तसेच रुग्णालय प्रशासन आणि सैनिक मंडळ यांच्यात नियमित संवाद व समन्वय ठेवण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा,  वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, सहायक कुलसचिव अजित पाटील, जनसंपर्क अधिकारी रमेश कांदेकर, माजी सैनिक संतोष पाटील, सुरेश पाटील, दत्तात्रय जाधव, मारुती पाटील, शीतल उपाध्येय, दत्तात्रय मोहिते, महादेव देसाई, आनंदा टेमकर, अनंत भारमल आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes