SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी लाखो सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवणार; राष्ट्रपतीनी हस्तक्षेप करण्याची आमदार सतेज पाटील यांची मागणीमहादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, केंद्रीय वनमंत्री नामदार भुपेंद्र यादव यांची खासदार धनंजय महाडिक यांना ग्वाही"एक राखी सीमेवरील जवानांसाठी" या देशारक्षाबंधनाच्या उपक्रमात राख्या पाठवून सहभागाचे श्री. स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचे आवाहन....डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या १७ विद्यार्थ्यांची नामांकित हॉटेलमध्ये निवड‘गोकुळ’ चा शेतकरीहित दृष्टीकोन कौतुकास्पद... ; ‘गोकुळ’ला सहकार्य करण्यास एन.डी.डी.बी.कटिबद्ध : डॉ.मिनेश शहाउद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशिराळा तालुक्यातील करुंगली-गुंडगेवाडी येथील गावपुल कोसळला; वाहतूकीस बंदराज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू : मंत्री मंगल प्रभात लोढावीरपत्नीला मिळाला मायेचा आधार; लागेल तेवढे सिमेंट मोफत मिळाल्याने उभारले स्वप्नातील घरप्रा. राजमल जैन यांचे "भारत आणि अवकाश" या विषयावर अत्यंत प्रेरणादायी व्याख्यान

जाहिरात

 

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे रेडीओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर परीक्षेत यश

schedule30 Jul 25 person by visibility 327 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई (BARC) द्वारा घेतल्या जाणाऱ्या रेडीओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर (आरएसओ) या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ममता बांगरे आणि धीरज बागल  हे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

  डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी स्टडीजचे विद्यार्थी ममता बांगरे आणि धीरज बागल  यानी  अधिष्ठाता आणि संशोधन संचालक डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर परिश्रम करून हे यश प्राप्त  केले आहे. महाराष्ट्रात भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई व डी. वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूर या दोनच ठिकाणी हा ॲटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सुरु आहे.

    रेडीओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रेडीएशन थेरपी, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मेडिकल फिजीशिएस्ट व रेडीएशन सेफ्टी ऑफिसर आदी पदावर नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

     डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील,  कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे यांनी ममता व चेतन यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes