प्रा. राजमल जैन यांचे "भारत आणि अवकाश" या विषयावर अत्यंत प्रेरणादायी व्याख्यान
schedule30 Jul 25 person by visibility 237 categoryसामाजिक

कोल्हापूर : मोरादाबाद, उत्तर प्रदेश येशील तीर्थंकर महावीर विद्यापीठाचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीयख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ प्रा. राजमल जैन यांनी "भारत आणि अवकाश" या विषयावर अत्यंत प्रेरणादायी व्याख्यान दिले. हे व्याख्यान भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने मंगळवार, दिनांक २९ जुलै रोजी दुपारी 3:00 वाजता भौतिकशास्त्र विभागाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी विभागातील सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच इतर विज्ञानप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. आर. एस. व्हटकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. राजमल जैन यांचा शाल व पुस्तक देऊन सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. राजमल जैन हे रॉयल एस्ट्रोनोमिकल सोसायटी, इंग्लंड चे मानद फेलो असून त्यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये भारताच्या संशोधनाच्या प्रवासावर सखोल प्रकाश टाकला. त्यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) च्या स्थापनेपासून आजवरच्या यशस्वी मोहिमा आणि खगोल-भौतिकशास्त्राचे भासवल भारतीय संदर्भातील महत्त्व स्पष्ट करताना सांगितले, "विक्रम साराभाई यांनी भारता ला अवकाश संशोधनात जागतिक ओळख मिळवून दिली त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच आपल्याला नव्या वैज्ञानिक वाटा शोधाव्या लागतील" अशा अत्यंत प्रेरणादायी शब्दात चांद्रयान-१, चांद्रयान-२, मंगळ्यान, अदित्य-11 मिशन, आणि हालचाल सुरू असलेल्या नवीन मोहिमा यांचा सखोल आढावा घेतला.
विज्ञान आणि आत्मनिर्भरता यांचे नात प्रा. राजमल जैन यांनी स्पष्ट केले की, भारताच्या अंतराळ क्षेत्राने केवळ तांत्रिक क्षेत्रातच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या किफायतशीरतेच्या बाबतीतही जगभरात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यांनी इस्रोच्या स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण प्रणाली जीएसएलव्ही व पीएसएलव्ही यांचा उल्लेख करत भारताच्या आत्मनिर्भरतेचा गौरव केला. अमेरिका, जपान, युरोप, रशिया अशा अनेक देशांनी विरोध करत असून भारतीय शास्त्रज्ञांच्या संघर्षमय आणि यशस्वी जीवनकथा सांगून भारताची विज्ञानातील कारकिर्दीची व्याप्ती आणि गरज सर्व श्रोत्यांना स्पष्ट केली.
तसेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या यशाची आणखी एक भव्य झेप म्हणजे चांद्रयान-३ या भारताच्या चंद्रावरील यशस्वी मोहिमेचे उदाहरण देत मर्यादित साधन संपत्ती असूनही वैज्ञानिक दृष्टीकोन, सातत्य व आत्मनिर्भरता यांच्या बळावर जागतिक स्तरावर यश मिळवता येते अशा प्रेरणादायी शब्दात मार्गदर्शन केले. पृथ्वी आणि सूर्य यांचं नात स्पष्ट करत, प्रा. राजमल जैन यांनी सूर्य आणि पृथ्वीचं नात केवळ अंतराळातील दोन खगोलीय वस्तूंमधील भौतिक संबंध नसून, ते संपूर्ण सजीव सृष्टीच्या अस्तित्वाचं मूळ कारण आहे अशी महत्वपूर्ण माहिती दिली.
प्रा. सोनकवडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात तांत्रिक प्रगतीशी संबंधित फायदे आणि जोखीम याबाबत जागरूक राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. व्ही. एस. कुंभार यांनी आभार मानले. विद्यार्थिनी वैष्णवी यादव आणि प्रज्ञा गणगे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. विभागातील प्राध्यापक डॉ. के. वाय. राजपुरे, डॉ. ए. व्ही. मोहोळकर, डॉ. एन. एल. तरवाल, डॉ. एस. पी. दास, डॉ. एम. आर. वायकर, डॉ. ए. आर. पाटील, डॉ. एस. एस. पाटील इत्यादींसह विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.