SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरी चप्पल जीआय टॅगचे अधिकृत स्वामित्व लिडकॉम व लिडकर महामंडळाकडेचअण्णा भाऊ साठे यांची शिवाजी विद्यापीठात जयंतीमलेशियामध्ये डॉ. पद्मारेखा जिरगे यांच्या आंतरराष्ट्रीय शोधनिबंधाचे सादरीकरण होणारनियमांचे पालन करुन गणेशोत्सव उत्साहात साजरा करा; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे गणेश मंडळांना आवाहनकोल्हापुरातील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे ६०० विद्यार्थिनींना मोफत एचपीव्ही लसीकरणडीकेटीईच्या १५ विद्यार्थ्यांची ऍक्युटेक पॉवर सोल्युशन कंपनीत निवडकर्नाटक शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराधानगरीतील निष्ठावंत म्हणाले, आमचं ठरलंय....काँग्रेस सोडायची न्हाय; राधानगरीतील पदाधिकाऱ्यांचा सतेज पाटील यांना शब्द पंचगंगा घाटाची कोल्हापूर महापालिकेच्यावतीने फायर फारयटद्वारे स्वच्छतामहादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी लाखो सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवणार; राष्ट्रपतीनी हस्तक्षेप करण्याची आमदार सतेज पाटील यांची मागणी

जाहिरात

 

महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी लाखो सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवणार; राष्ट्रपतीनी हस्तक्षेप करण्याची आमदार सतेज पाटील यांची मागणी

schedule31 Jul 25 person by visibility 564 categoryराज्य

▪️वनताराला महादेवी हत्तीन पाठवण्याच्या पेटाच्या भूमिकेवर व्यक्त केला संशय
▪️नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाला आमदार सतेज पाटील यांची भेट

कोल्हापूर  : पेटाच्या भूमिकेनंतर महादेवी हत्तीणीला वनतारा येथे नेण्याची घटनाच संशयास्पद आहे. यामध्ये राजकारण करण्याची आपली इच्छा नाही. मात्र लोकांच्या भावना देखील तितक्याच महत्त्वाच्या असून जैन धर्मीय आणि हिंदू धर्माच्या भावना दुखावण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळं महादेवीला परत आणण्यासाठी, आता राष्ट्रपतींनीच यामध्ये हस्तक्षेप करावा यासाठी सह्यांच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करणार असल्याचं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाला त्यांनी आज भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला पोलीस बंदोबस्तात गुजरात येथील अंबानी यांच्या वनतारा जंगलात पाठवण्यात आले. नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी यांच्याकडे हत्ती गेली 34 वर्ष होती. या प्रकारा नंतर, जैन समुदायातून याचा मोठा विरोध करण्यात येत आहे. जैन समुदायाच्या भावना दुखावल्या असून नांदणीसह शिरोळ परिसरातील नागरिकांनी, जिओचे, सिम कार्ड पोर्ट करण्याची मोहीम आता सुरू केली आहे. एकूणच शिरोळ तालुक्यातील लोकांच्या मध्ये या घटनेचा संदर्भात तीव्र निषेध करण्यात येत असून या सर्व पार्श्वभूमीवर, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज गुरुवारी,नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ या ठिकाणी भेट दिली. यावेळी, आमदार सतेज पाटील यांनी, स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी आणि 
जैन समुदायांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्याने आता जन भावनेचा विचार करता महामहीम राष्ट्रपतींनी महादेवी हत्तीनीला  परत करण्याबाबत फेर विचार करावा. अशी मागणीही यावेळी आमदार सतेज पाटील यांनी केली. पेटाच्या भूमिके नंतर महादेवी हत्तीणीला वनतारा येथे नेण्याची घटना संशयास्पद आहे. यामध्ये राजकारण करण्याची आपली इच्छा नाही. मात्र लोकांच्या भावना देखील तितक्याच महत्त्वाच्या असून जैन धर्मीय आणि हिंदू धर्माच्या भावना दुखावण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे महादेवीला परत आणण्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकारनही यामध्ये हस्तक्षेप करावा. अशी मागणीही त्यांनी केली. 
शिवाय महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी आपण, सह्यांची मोहीम सुरू केली आहे. या माध्यमातून लाखो सह्याच निवेदन आपण राष्ट्रपतींना पाठवणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राष्ट्रपतींच्यानी हस्तक्षेप करावा. अशी आपण मागणी करणार असल्याचेही विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. 
 
 हत्तीच्या माध्यमातून ही सुरुवात आहे. हत्ती नेण्याचे हे षडयंत्र आपणाला वाटतय. येणाऱ्या काळात मठाच्या बाबतीत देखील काही वेगळी भूमिका होईल काय? अशी शंकाही आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली. गुजरातला हत्तीच हवे असतील तर त्यांनी चंदगड पासून कर्नाटक पर्यंत असलेले हत्ती घेऊन जावेत. यासाठी माहूत देखील आम्ही देऊ असे आव्हानंही त्यांनी केले.

 यावेळी, माजी आमदार राजूबाबा आवळे, सागर शंभूशेटे, सुनील पाटील, दीपक मगदूम, अनिल पाटील, सचिन पाटील, अशोक मगदूम, माजी नगरसेवक नितीन बागे, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, प्रकाश दानोळे, संजय बोरगावे, महेश परीट, शितल उपाध्ये, सचिन लठ्ठे, शितल लठ्ठे, यांच्यासह नांदणी गावांतील आणि शिरोळ तालुक्यातील विविध गावातील जैन बांधव, ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes