"एक राखी सीमेवरील जवानांसाठी" या देशारक्षाबंधनाच्या उपक्रमात राख्या पाठवून सहभागाचे श्री. स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचे आवाहन....
schedule31 Jul 25 person by visibility 332 categoryसामाजिक

कोल्हापूर : सैनिकाची आठवण फक्त युध्दाच्या वेळी नव्हे तर सतत २४ तास जीवावर उदार होऊन लढणाऱ्या समस्त सैनिकांना अभिवादन म्हणून त्याचे नैतिक बळ वाढवण्यासाठी कारगील युध्दापासून गेली २६ वर्षे श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध शाळा महाविद्यालय महिला बचत गट महिला संस्था व व्यक्ती यांच्याकडून जमा झालेल्या १ लाखाहून अधिक राख्या मराठा बटालियन (टी.ए) च्या सहकार्याने थेट सीमेवर दुर्गम भागात पाठवले जातात.
राख्या बांधणारे हात कमी होऊ नयेत या नारीशक्तीच्या जनजागृतीसह सदर उपक्रम राबवला जातो. यावर्षीचा जाहिर कार्यक्रम बुधवार दि. ०६/०८/२०२५ रोजी सकाळी ११.३० वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक या ठिकाणी होणार असून या वेळी शिवगंधार प्रस्तुत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम तसेच विविध शाळांच्या वतीने देशभक्तीपर गीते व नृत्य सादर केली जाणार आहेत. तरी मंगळवार दि. ०५/०८/२०२५ रोजी सायं ५.०० वा. पर्यंत खालील संकलन केंद्रावर राख्या पाठवाव्यात असे आवाहन करण्यात येत आहे.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाटगे, राजेंद्र मकोटे, कमलाकर किलकिले, महेश कामत, डॉ. सौ. सायली कचरे, सुखदेव गिरी, प्रशांत बरगे, तुषार साळगावकर, सौ. माधुरी नकाते, सौ. योगिता काडोलिकर, सौ. यशश्री घाटगे, गुरूदत्त म्हाटगुत, अशोक लोहार, धनंजय नामजोशी, उमेश निरंकारी, सागर घोरपडे, नंदु गुरव, स्वानंद पाठक आदि कार्यरत आहेत.
🟣 संकलन केंद्र खालील प्रमाणे :-
१. कोल्हापूर शहर: प्रबोधन क्लासेस आझाद चौक
२. नागराज पेपर स्टॉल: शुक्रवार गेट
३. कामत झेरॉक्स: शहाजी कॉलेज आणि टेंबे रोड
४. भिवटे पोहे सेंटर: महाव्दार रोड
५. हॉटेल चिनी चायनीज अर्बन बँकेजवळ, ताराबाई पार्क
६. मँगो एफ.एम. रेडिओ: ताराबाई पार्क
७. भगिनी मंच: शिवालय, शनिवार पेठ
८. देवयानी नेट कॅफे ईगल प्राईड, मिरजकर तिकटी
९. मैत्रिण मंच: समर्थ ज्वेलर्स, पंचरत्न प्लाझा, गुजरी
१०. श्रीराम सलुन: रघुनाथ टिपुगडे, मेन रोड राजारामपुरी ५ वी गल्ली
११. जय महाराष्ट्र रसवंती गृह कमालाकर किलकिले, रविवार पेठ, लक्ष्मीपुरी
१२. आनंद मिल्क कॉर्नर किरण पोवार, मिरजकर तिकटी, पाण्याच्या हौदाजवळ
१३. म्हार्डगुत पोहे सेंटर महाव्दार रोड, वांगी बोळासमोर
१४. अभिजीत न्यूज पेपर एजन्सी श्री लस्सी समोर, रंकाळा वेस स्टैंड
१५. ए.एस. पाठक ज्वेलर्स हॉटेल ओशो शेजारी, बिनखांबी गणेश मंदिर रोड, कोल्हापूर
१६. राधानगरी : तुषार साळगांवकर, विजय बकरे पेपर स्टॉल, साई फोटो स्टुडिओ नंदू गुरव (पत्रकार) मेन रोड, राधानगरी
१७. गारगोटी: पत्रकार सविता सुभाष माने (भुदरगड टाईम्स)
१८. बांबवडे : रत्नश्याम ज्वेलर्स नामदेव गिरी, बाजार पेठ, बांबवडे, ता. शाहूवाडी