+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustदिपावली उत्सवाच्या कालावधीत फेरीवाले, दुकानदारांनी पट्ट्याच्या आतच व्यवसाय करावा, अन्यथा... adjustमविआचे 85-85-85 जागांवर एकमत; मविआ 18 जागा कुणाला देणार याकडे सर्वांचे लक्ष adjustविधानसभा निवडणूक: कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघात आज 4 उमेदवारी अर्ज दाखल adjustसर्वात जास्त मृत्यू रस्ते अपघातामूळे, रस्ते सुरक्षेला प्राधान्य द्या : अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालय रस्ते सुरक्षा समिती, अभय सप्रे adjustकोल्हापूर महानगरपालिका : देखभाल दुरुस्ती कालावधीतील रस्त्यांची तपासणी करुन अहवाल सादर न केलेने अतिरिक्त आयुक्त, उप-आयुक्त व सहा.आयुक्तांना कारणे दाखवा नोटीसा adjustकोल्हापूर महानगरपालिका : कामावर वेळाने हजार झालेल्या 77 सफाई कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन व 2 आरोग्य निरिक्षक, 5 मुकादमांचे एक दिवसाचे वेतन कपात करुन कारणे दाखवा नोटीस adjustडॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव; 90 वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा adjustडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची बुटकॅम्प २०२४ स्पर्धेत चमकदार कामगिरी adjustसक्षम ॲपचा वापर करुन दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा adjustअभाविपकडून सामाजिक व सांस्कृतिक संदेश देणारी शिवमल्हार यात्रा !
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule08 Jul 24 person by visibility 338 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए.आय.) व मशीन लर्निंग विभागातील शर्वरी संतोष पाटील व हृषिकेश लक्ष्मीकांत शहाणे या दोन विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अंतर्गत अहमदाबाद येथील स्पेस एप्लिकेशन्स सेंटर येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.

 शर्वरी व हृषिकेश यांचा सातत्यपूर्ण अभ्यास, प्रकल्प कार्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्यामुळे ही निवड झाली आहे. या प्रशिक्षणाद्वारे त्यांना अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील व्यावहारिक ज्ञान मिळणार आहे. येथील प्रशिक्षण व अनुभवाचा त्यांना पुढील जीवनात चांगला फायदा होईल असा विश्वास डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी व्यक्त केला. डॉ. गुप्ता यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, , प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील, प्रा. एस. आर. खोत व विभागातील प्राध्यापक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.