SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शेतकऱ्यांनी घाबरू नये, सरकार पाठीशी; लवकरच दुष्काळ जाहीर होणार : हसन मुश्रीफमोफत आरोग्यसेवेसाठी अद्ययावत फिरता दवाखाना सुरू; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण‘श्री गणेशा आरोग्याचा 2.0’ अंतर्गत 1 हजार 88 आरोग्य शिबिरेसत्यशोधक समाज: समता आणि सुधारणेचा क्रांतिकारी सरनामाचित्रनगरीत विद्यार्थ्यांनी अनुभवले ‘सेट’मागचे जगहादक! कानातील हेडफोनमुळे १७ वर्षीय तरुणीचा रेल्वे धडकेत जागीच मृत्यू; इचलकरंजी हादरलीशिरूर हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ७४ वर्षीय वृद्ध महिलेचा जीव गेला; रोहिदास नगरात संतापाची लाटगोकुळ निवडणूक: अर्जांच्या छाननीत दिग्गजांना दणका; अर्ज अपात्र ठरले तरी काहींना दिलासा, अंतिम चित्र गुरुवारी स्पष्ट होणार कोल्हापूर जिल्ह्यात अनंत चतुर्दशी विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून व्यापक सुरक्षा व्यवस्था; ४ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात!प्रचारसाहित्य, फलक लवकरात लवकर काढण्याची कार्यवाही करण्याचे विभागीय आयुक्तांचे निवडणूक प्रशासनाला निर्देश

जाहिरात

 

मोफत आरोग्यसेवेसाठी अद्ययावत फिरता दवाखाना सुरू; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

schedule24 Sep 26 person by visibility 144 categoryआरोग्य

कोल्हापूर : शहरातील वस्त्या व झोपडपट्टी भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सुरू असलेल्या मोफत फिरत्या दवाखान्यासाठी नवीन अद्यावत वाहनाचे लोकार्पण नामदार चंद्रकांतदादा पाटील, अंजली पाटील यांच्या हस्ते आज भाजपा जिल्हा कार्यालयात करण्यात आले.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, राहूल चिकोडे, अभय वंटे, यल्लाप्पा गाडीवडर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या फिरत्या दवाखान्यात एक डॉक्टर व एक सहाय्यक अशी टीम कार्यरत असून, दररोज दोन झोपडपट्टी किंवा वस्ती भागांमध्ये दवाखाना थांबवून नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाते. आठवड्यातील सहा दिवसांमध्ये १२ ठिकाणी हा दवाखाना पोहोचतो. दररोज अंदाजे १०० ते १२५ नागरिक या आरोग्यसेवेचा लाभ घेतात.

या उपक्रमामध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, डॉक्टरांचा सल्ला, उपचार तसेच आवश्यक औषधांचे मोफत वितरण केले जाते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांना त्यांच्या घराजवळच आरोग्यसेवा मिळत आहे.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून समाजाच्या विविध गरजा लक्षात घेऊन सातत्याने लोकहिताचे उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा फिरता दवाखाना शहरातील विविध वाड्या-वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने आधार देत आहे.
नवीन अद्यावत वाहनामुळे या आरोग्यसेवेचा विस्तार अधिक प्रभावीपणे करता येणार असून, ‘आरोग्यसेवा नागरिकांच्या दारी’ या संकल्पनेला अधिक बळ मिळणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes