SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना कराशेतकऱ्यांनी घाबरू नये, सरकार पाठीशी; लवकरच दुष्काळ जाहीर होणार : हसन मुश्रीफमोफत आरोग्यसेवेसाठी अद्ययावत फिरता दवाखाना सुरू; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण‘श्री गणेशा आरोग्याचा 2.0’ अंतर्गत 1 हजार 88 आरोग्य शिबिरेसत्यशोधक समाज: समता आणि सुधारणेचा क्रांतिकारी सरनामाचित्रनगरीत विद्यार्थ्यांनी अनुभवले ‘सेट’मागचे जगहादक! कानातील हेडफोनमुळे १७ वर्षीय तरुणीचा रेल्वे धडकेत जागीच मृत्यू; इचलकरंजी हादरलीशिरूर हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ७४ वर्षीय वृद्ध महिलेचा जीव गेला; रोहिदास नगरात संतापाची लाटगोकुळ निवडणूक: अर्जांच्या छाननीत दिग्गजांना दणका; अर्ज अपात्र ठरले तरी काहींना दिलासा, अंतिम चित्र गुरुवारी स्पष्ट होणार कोल्हापूर जिल्ह्यात अनंत चतुर्दशी विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून व्यापक सुरक्षा व्यवस्था; ४ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात!

जाहिरात

 

शेतकऱ्यांनी घाबरू नये, सरकार पाठीशी; लवकरच दुष्काळ जाहीर होणार : हसन मुश्रीफ

schedule24 Sep 26 person by visibility 134 categoryराज्य

सेनापती कापशी : पिके संकटात आल्यामुळे राज्यात सरसकट 100 टक्के दुष्काळ पडलेला आहे. या नैसर्गिक संकटात सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सरकार येत्या दोन- तीन दिवसात दुष्काळ जाहीर करणार असून शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असा दिलासा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. हसूर खुर्द ता.कागल येथे शेतकरी मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
           
भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. लवकरच कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांचे पंचनामे करणार आहेत. ज्या- ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे त्या- त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिल्याशिवाय सरकार स्वस्त बसणार नाही. कारण हे शेतकऱ्यांचे सरकार आहे.      
        
यावेळी संजयबाबा घाटगे म्हणाले, शेतकऱ्यांच्या जीवनातील समृद्धी पाहून समाधान वाटत आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही पीक-पाणी चांगलं पिकू दे. मुश्रीफ साहेबांच्या पाठबळावर गावचा चांगला विकास झाला आहे. येथून पुढेही दोन्ही गटांनी एकजुटीने, आनंदाने रहा, अशी इच्छा व्यक्त केली.
       
याप्रसंगी माजी सरपंच व तालुका संघाचे संचालक अंकुश पाटील म्हणाले, सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस म्हणजे मंत्री मुश्रीफ आहेत. त्यांच्या कृपेने गावातील 95 टक्के विकास कामे झाली आहेत.
             
▪️पाणी काटकसरीने वापरा......!
मंत्री  मुश्रीफ म्हणाले, चिकोत्रा प्रकल्प भरण्यास विलंब लागला आहे. सध्या चिकोत्रा ९२ टक्के भरलेले आहे. यामुळे चिकोत्रा व नागनवाडी या दोन्ही धरणावर पाण्याचा ताण पडणार आहे. तेव्हा वर्षभर पाण्याचे नियोजन करून पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी शेतक-यांना केले.   
             
कार्यक्रमासाठी शशिकांत खोत, सुनिल चौगले, सूर्याजी घोरपडे, धनाजी तोरस्कर, दीपक सोनार, दिनेश मुसळे, आनंदा जाधव, ए. जी. साळोखे, दत्तात्रय गडकरी, उपसरपंच सुभाष माने, बाबूराव भोसले, पुरूषोत्तम साळोखे, अशोक दाभोळे यांच्यासह ग्रा.पं.सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संस्थेने उपस्थित होते. 
            
यावेळी प्रमुख मान्यवरांचे लेझीम पथक व वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात स्वागत केले. सरपंच सुभाष गडकरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विनायक जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.विशाल जाधव यांनी आभार  मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes