SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीरससेगाव येथे २५ लाख रुपयांच्या विकासकामांचे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटनडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजलीकोल्हापुरात 'गुड फ्रायडे' निमित्त ख्रिस्ती बांधवांकडून विशेष प्रार्थना; चर्चमध्ये भाविकांची गर्दीशिधावाटप विभागाचा मोठा धडाका! वैजापूर रोडवर LPG चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्तगुड फ्रायडे : त्याग, क्षमा आणि करुणेचा दिवसभक्ती आणि उत्साहाचा सोहळा! कोल्हापुरात करवीरनिवासिनी अंबाबाईचा रथोत्सव मोठ्या उत्साहात राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; अमोल येडगे छत्रपती संभाजीनगरचे नवे महापालिका आयुक्तवादळी वाऱ्यामुळे मुख्य वीज वाहिनी बाधित; काळम्मावाडी योजनेचा पाणीपुरवठा तात्पुरता विस्कळीत

जाहिरात

 

ससेगाव येथे २५ लाख रुपयांच्या विकासकामांचे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटन

schedule03 Apr 26 person by visibility 98 category

शाहूवाडी : शाहूवाडी तालुक्यातील ससेगाव येथे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते एकूण २५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन उत्साहात पार पडले. यामध्ये गोसावी वस्तीसाठी सांस्कृतिक हॉल आणि विद्यामंदिर ससेगाव येथील शाळा खोलीच्या बांधकामाचा समावेश आहे.

ससेगावच्या विकासासाठी आमदार कोरे यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये गोसावी वस्तीत सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने १५ लाख रुपये खर्चून सांस्कृतिक हॉल बांधण्यात येणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी विद्यामंदिर ससेगाव येथे १० लाख रुपये निधीतून नवीन वर्ग खोलीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कामांमुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे जनसुराज्य शक्तीचे गटनेते सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर), शाहूवाडी पंचायत समितीचे उपसभापती अमरसिंह खोत, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रंगराव खोपडे, आणि युवा नेते युवराज काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ससेगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन यावेळी मान्यवरांनी दिले.

तसेच, ससेगावच्या सरपंच वनिता पारळे, उपसरपंच पांडुरंग पाटील, माजी सरपंच अशोक गोसावी, वसंत गोसावी यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुनिता गोसावी, उपाध्यक्षा प्रियांका पारळे आणि शाहूवाडी तालुका गोसावी समाज अध्यक्ष भरत गोसावी उपस्थित होते.

कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य बाळाबाई गोसावी, सुनंदा पाटील, सविता सुतार, शिवाजी सुतार यांच्यासह गावातील प्रमुख मान्यवर, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes