छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली
schedule03 Apr 26 person by visibility 140 categoryराज्य
मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-1 जितेंद्र भोळे, उप सचिव विजय कोमटवार, उप सभापती यांचे खाजगी सचिव आविनाश रणखांब, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक निलेश मदाने यांचेसह अन्य अधिकारी व कर्मचारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.