SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी : वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ3 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली 'सतेज मॅथ्स स्कॉलर' परिक्षा१३ डिसेंबरच्या लोकअदालतीत ई-चलान तडजोड प्रकरणे स्वीकारली जाणार नाहीत; नागरिकांनी अफवांना बळी पडू नयेशिवाजी विद्यापीठात दिव्यांगांसाठी करिअर गाईडन्स, सांस्कृतिक कार्यक्रममहाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त विद्यापीठात दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजनडीकेटीईचा देशपातळीवरील आयआयसी मीट मध्ये बेस्ट पोस्टर पुरस्काराने सन्मानभ्रष्टाचार निर्मूलन संदर्भातील "चला भ्रष्टाचार संपवूया" जागरुकता कार्यशाळेचा व्यापारी-उद्योजकांनी लाभ घ्यावाकोल्हापूर : शूटिंग रेंजचे खाजगीकरण होणार नाही : जिल्हाधिकारी अमोल येडगेकोल्हापुरात माजी महापौर सई खराडे, शिवतेज खराडे, इंद्रजीत आडगुळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेशध्वज दिन निधीला हातभार लावूया… सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुया.. !

जाहिरात

 

आधारभूत खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

schedule15 Oct 25 person by visibility 266 categoryराज्य

▪️सन २०२५-२६ खरेदी हंगामाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने बैठक

कोल्हापूर : शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळावा आणि त्यांना शेतीमाल विक्रीसाठी सुलभ सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आधारभूत खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. यंदाच्या २०२५-२६ खरेदी हंगामाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली. धान, नाचणी आणि सोयाबीनच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर सोयीस्कर सुविधा मिळावी, यावर विशेष भर देण्यात आला आहे.

▪️जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले की, ग्रामीण आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांनाही योग्य दर आणि धानासाठी अतिरिक्त बोनस मिळावा, यासाठी नवीन खरेदी केंद्रे प्रस्तावित करणे गरजेचे आहे. यंदा धानाला २,३६९ रुपये, रागीला ४,८८६ रुपये आणि सोयाबीनला ५,३२८ रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव निश्चित झाला आहे. या बैठकीत पणन महासंघाला सर्व तालुक्यांमध्ये धान्य खरेदी केंद्रांसाठी उपअभिकर्ता संस्थांची नेमणूक करण्याचे निर्देश देण्यात आले. इच्छुक सहकारी तालुका खरेदी-विक्री संघ, सहकारी संस्था आणि फार्मर प्रोड्युसर संस्थांना पणन महासंघाच्या अटी व निकषांनुसार प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रस्ताव सादर करण्यासाठी शेतकरी आणि संस्थांनी जिल्हा पणन अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीला जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) नीलकंठ करे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा पणन अधिकारी गजानन मगरे, पणन महासंघाच्या संचालिका धनश्रीदेवी घाटगे यांच्यासह जिल्ह्यातील सहकारी खरेदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी येडगे यांनी गाव पातळीवर महसूल विभागाच्या सहाय्याने हमीभाव केंद्रांबाबत जनजागृती करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांनी ‘पीक पाहणी’ पोर्टल तसेच शासनाच्या विविध ऑनलाइन व्यासपीठांवर नोंदणी करून आपला शेतमाल हमीभावाने विक्रीसाठी सादर करावा, असे आवाहन त्यांनी केले. नोंदणीसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, ७/१२ उतारा, बँक पासबुकची झेरॉक्स, मोबाइल नंबर आणि पिकाची माहिती यासारखी कागदपत्रे सादर करावी लागतील. ऑनलाइन नोंदणीसाठी OTP पडताळणी आणि आधार/e-KYC प्रक्रिया पूर्ण करून अर्ज सबमिट करावा लागेल.

शेतकऱ्यांनी हमीभाव मिळावा म्हणून काय करा

•नोंदणी: जवळच्या अधिकृत प्रस्तावित केंद्रावर किंवा ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करा.

•कागदपत्रे: आधार कार्ड, ७/१२ उतारा, बँक पासबुक आणि पिकाची माहिती तयार ठेवा.

•संपर्क व माहिती साठी : कृषी सहायक, तलाठी, तालुका कृषी विभाग, तहसील कार्यालय किंवा जिल्हा पणन अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधा.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes