SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे पालक सभा उत्साहात; विद्यार्थिनींच्या प्रगतीचे पालकांकडून कौतुकमहिला समानता दिन: समानतेच्या हक्काची आणि प्रगतीची नवी क्षितिजेसीमेवरील जवानांसाठी करवीरकर भगिनींची ओवाळणी: 'एक राखी' ठरतेय बारा हत्तींचे नैतिक बळ!पंचगंगा प्रदूषण करणाऱ्यांवर ठोस कारवाई करा : आमदार यड्रावकर ; पंचगंगा प्रदूषणासंदर्भात मुंबई मंत्रालयात बैठक संपन्न स्थानिक विकास निधीतून उचगावमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ, उचगावच्या सर्वागिण विकासासाठी १ कोटी रूपयांचा निधी देणार, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाहीआमदार यड्रावकर यांचा पाठपुरावा : सरंजाम इनाम जमिनींचा प्रश्न मार्गी लागणार राज्यात खळबळ! धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात 'एस.पी. गँग'वर कोल्हापुरात पहिलीच MCOCA कारवाई; बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी व गर्भपाताचा गोरखधंदा चालवणाऱ्या ११ जणांच्या मुसक्या आवळल्याडी. वाय. पाटील विद्यापीठाचा ‘टाटा स्किल्स’ सोबत सामंजस्य करारविभागीय कार्यालय स्तरावर नागरिकांच्या तक्रारी सोडवा; अतिक्रमणावर सातत्याने कारवाई करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडसंजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १४वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

जाहिरात

 

डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात वाचन प्रेरणा दिन

schedule15 Oct 25 person by visibility 385 categoryसामाजिक

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात आज वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या वतीने राजर्षी शाहू सभागृहात प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विशेष वाचन उपक्रम आयोजित केला. यावेळी भारतीय संविधानाची उद्देशिका आणि मूलभूत अधिकार व कर्तव्ये या विभागातील कलमांचे सामूहिक मूकवाचन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी आभार मानले. विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतही शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशिकेसह मूलभूत अधिकारांचे वाचन करून उपक्रमात सहभाग दर्शविला.

तत्पूर्वी, डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुख्य प्रशासकीय भवन इमारतीमध्ये त्यांच्या प्रतिमेस कुलसचिव डॉ. शिंदे यांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. सुतार, डॉ. चौगुले, डॉ. मच्छिंद्र गोफणे, डॉ. किशोर कुच्चे, डॉ. ज्योती खराडे, डॉ. जयकुमार भोसले, डॉ. श्रद्धा खराडे, डॉ. एस.आर. यन्कंची, डॉ. सुनील गायकवाड, डॉ. माधव भिलावे, डॉ. किरण कुमार शर्मा, उपकुलसचिव गजानन पळसे यांच्यासह गणित अधिविभागातील शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes