राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा कसबा बावडा शाळेमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात
schedule15 Oct 25 person by visibility 103 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्ताने कसबा बावडा भागातील वृत्तपत्र विक्रेता शंकर चेचर यांच्या हस्ते पुष्पहार घालून माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचून माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यासारखे उच्च पदावर जावे असे मत वृत्तपत्र विक्रेता व शाळेचे माजी विद्यार्थी पंचात्तर वर्षीय शंकर चेचर मामा यांनी व्यक्त केले .शाळेचे केंद्र शाळा मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील यांनी पुस्तक वाचन करणे ही विद्यार्थ्यांसाठी पर्वणी असून त्यामुळे जास्तीत जास्त या संधीचा फायदा घ्यावा. जीवनामध्ये जगत असताना पुस्तकासारखा मित्र असणे फार महत्वाचे असते पुस्तकांमधून विविध भाषा संस्कृतीचे ज्ञान व दर्शन घडते एक पुस्तक आपल्याला जीवन कसे जगायचे याची धडे देऊन जाते. सध्याच्या युगामध्ये मोबाईलच्या आहारी विद्यार्थ्यांनी न जाता पालकाने सुद्धा मुलांना मोबाईल पासून दूर ठेवावे व दररोज मराठी वाचन हिंदी वाचन इंग्रजी वाचन घेतले पाहिजे असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी प्रभागातील रिक्षा मंडळाचे सदस्य वसंत केळकर ,नामदेव ठाणेकर, अजित पाटील, श्रीराम सोसायटीचे संचालक विनायक चौगले ,सरदार पाटील,योद्धा पोलीस अकॅडमीचे रणजीत निवडे , रफिक आफराज ,अतुल पाटील, गंभीरराव चौगुले, आनंदराव घाटगे ,रवींद्र कुलकर्णी यांना तरुण भारत व पुढारी या वृत्तपत्राचे वाटप करून वृत्तपत्र दिन साजरा करण्यात आला. शाळेतील शिक्षक आर.जी.किर्तीकर यांनी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनातील कठीण प्रसंगाची माहिती सांगून त्यावर त्यांनी कशाप्रकारे मात करून आपले शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पूर्ण केले याची माहिती सांगितली. तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक उत्तम कुंभार यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम साहेबांची प्रेरणा घेऊन त्यांच्याप्रमाणे यशाची शिखरे पादाक्रांत करण्याचे आवाहन केले .आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या शाळेतील विद्यार्थीनी आराध्या काळे, तेजस्विनी बावस्कर,स्वरा देवकुळे यांनी डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांची वेशभूषा साकारून कलाम साहेबांप्रमाणे सायकल वरून प्रभागात तसेच बावडा भाजी मंडई मध्ये वृत्तपत्राचे वितरण केले.
आजच्या कार्यक्रमासाठी शाळा उपमुख्याध्यापक उत्तम कुंभार, उत्तम पाटील ,आर.जी. किर्तीकर , अमित पोटकुले, तमेजा मुजावर ,विद्या पाटील, दिपाली यादव, बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील व सावित्री काळे,पायल पाटील,खुशबू शेख,निशिगंधा वाघमारे, पूनम कुंभार हे उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर.जी.किर्तीकर यांनी केले तर आभार अमित पोटकुले यांनी मानले.कार्यक्रमासाठी विद्यार्थी,पालक व भागातील नागरीक उपस्थित होते.