डॉक्टर्स चॅम्पियन ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आजपासून कोरोची येथे प्रारंभ
schedule04 Apr 25 person by visibility 210 categoryक्रीडा

कोल्हापूर : डॉक्टर्स चॅम्पियन ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला शुक्रवार 4 एप्रिल पासून सुरुवात होत आहे. डॉ.समीर कोतवाल यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा होत आहे.
कोरोची येथील मैदानावर 4 ते 6 एप्रिल दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत डॉक्टरांचे आठ संघ सहभागी होत आहेत.
यामध्ये व्हाईट कोट वॉरियर्स सांगली, जीपीएस रॉयल किंग, तासगाव सुपर किंग, केजीएफ, सांगली सुपरस्ट्रायकर, ओशियन रायडर्स राजापूर, इस्लामपूर युनायटेड डॉक्टर्स इलेव्हन, डॉक्टर पिशवीकर इलेव्हन, डॉक्टर्स स्पोर्ट्स क्लब इचलकरंजी या संघांचा समावेश आहे. आरोग्य सेवेसाठी सातत्याने तत्पर असणाऱ्या डॉक्टर्सना आपले क्रिकेटिंग स्किल्स दाखवण्याची संधी मिळावी, संघ भावना वाढीस लागावी, फिटनेस बद्दल जागरूकता व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
विजेता, उपविजेता संघाबरोबर वैयक्तिक बक्षीसे सुद्धा दिली जाणार आहेत.