SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सारंग देशमुख यांच्या सोबतीने महायुती मजबूत : चंद्रकांतदादा पाटीलखासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारककर्करुग्णांसाठी मोठा दिलासा विस्तारित महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत PET-CT स्कॅनचा समावेशपदवीधर, शिक्षक उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा घरोघरी संपर्ककौशल्यातूनच जागतिक नेतृत्व शक्य : प्रा. डॉ. भीमराया मेत्री३१ ऑक्टोबरपर्यंत थकीत मुद्दल न भरल्यास ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा खंडित करणारगरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस: कारण, महत्त्व आणि संकल्पप्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.3 राजारामपुरी व केंद्र क्रं.4 पंचगंगा या आरोग्य संस्था गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम अंतर्गत राज्यस्तरीय मानांकनास पात्रकोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘फ्युचर रेडी इंजिनिअर ’ कार्यक्रमाचा समारोप'गोकुळ' निवडणुकीत विश्वासाचा घात; महायुतीचे नेते स्वतःच्याच कार्यकर्त्यांवर अविश्वासी : आ. सतेज पाटील यांचा घणाघात

जाहिरात

 

पन्हाळा नगरपरिषदेच्या वतीने घरगुती ,सार्वजनिक गणेशोत्सव महोत्सव स्पर्धा

schedule12 Sep 24 person by visibility 783 categoryराज्य

पन्हाळा : पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषद पन्हाळा पर्यावरण पूरक घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सव महोत्सव गणेशोत्सव स्पर्धा २०२४ करिता नगरपरिषदेकडून सर्व घरगुती गणपती व सार्वजनिक गणपती यांचे परीक्षण केले आहे. या स्पर्धेसाठी सार्वजनिक गणपती बक्षीस वितरण २ ऑक्टोंबर रोजी होईल. अशी माहिती नगरपरिषदेची अधीक्षक अमित माने यांनी दिली.

सार्वजनिक गणेशोत्सव घरगुती गणेशोत्सव स्पर्धा करिता खालील प्रमाणे बक्षीस आहेत. प्रथम क्रमांक,रू.१००००/- सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांक, रू.७०००/- सन्मानचिन्ह प्रमाणपत्र,तृतिय क्रमांक, रु.५०००/- सन्मानचिन्ह प्रमाणपत्र. 
पर्यावरण पूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा करिता
प्रथम क्रमांक,रू.५०००/- सन्मानचिन्ह प्रमाणपत्र,व्दितीय क्रमांक रु.३०००/- सन्मानचिन्हवप्रमाणपत्र,तृतिय,क्रमांक रू.२०००/- सन्मानचिन्ह प्रमाणपत्र

स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पन्हाळा शहरातील नागरिकांसाठी पर्यावरणपूरक आयोजित करणेत आली आहे. ही स्पर्धा २०१९ पासून सुरुवात झाली आहे.

 गेल्यावर्षी घरगुती गणपती मध्ये असे क्रमांक. आले होते.प्रथम - तनुजा सुभाष गवळी, द्वितीय- आशिकी चेतन राऊत
तृतीय - यश बाळासाहेब भोसले तर सार्वजनिक मंडळामध्ये प्रथम,बालाजी क्रीडा मंडळ. द्वितीय, श्री दत्त तरुण मंडळ. तृतीय धर्मवीर क्रीडा मंडळ यावर्षी स्थानिक बारा मंडळा नी यात सहभाग घेतलाय आहे.परीक्षण करण्यासाठी नगरपरिषदचे कर्मचारी,सुहास भोसले, नंदूकुमार कांबळे, नरेंद्र कांबळे, मुकुल चव्हाण, शंतनु सुतार,इत्यादी होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes