SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
परिवहन समितीचे नूतन सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर; केएमटी स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावेसुधारित आकृतीबंध आणि फेरीवाला समितीच्या मुद्द्यावरून काँग्रेस-शिवसेना (उबाठा) आक्रमक; आजपासून महापालिकेसमोर लाक्षणिक साखळी उपोषण!आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: यशवंतराव चव्हाणकोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणीहातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदी शिवसेनेचे संतोष कांबळे बिनविरोधटाकाळा माळी कॉलनी येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासोबत केली पाहणीकोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी कौसर बागवान, उपसभापतीपदी दिपा ठाणेकर यांची निवडनगररचना विभागाकडून आयोजित एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 62 प्रकरणे मंजूरसकारात्मकता आणि विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. ज्ञानवत्सल स्वामी; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ उत्साहात; ७४१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान ‘डिपेक्स’मध्ये केआयटी प्रथम राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये वेस्ट मॅनेजमेंट विभागात प्रथम पारितोषिक

जाहिरात

 

डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना गेट्स फाऊंडेशनचा गोलकिपर्स चँपियन्स सन्मान

schedule24 Sep 25 person by visibility 352 categoryदेश

▪️बालमृत्यू रोखण्यासाठीच्या प्रयत्नांची जागतिक दखल; जगभरातील १० व्यक्तींचा सन्मान

गडचिरोली : बिल गेट्स यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यरत असणाऱ्या गेट्स फाऊंडेशनचा सन्मानाचा गोलकिपर्स चँपियन्स हा जागतिक सन्मान ‘सर्च’ संस्थेचे संस्थापक डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना मंगळवारी जाहीर झाला. न्यूयॉर्क येथे झालेल्या समारंभात ‘सर्च’च्या वतीने सहसंचालक डॉ. आनंद बंग सहभागी झाले. ‘सर्च’सह जगभरातील दहा संस्थांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांना ग्लोबल गोलकिपर हा पुरस्कार देण्यात आला.

डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांचे सार्वजनिक आरोग्य आणि विशेष करून बालमृत्यू रोखण्यासाठी केलेल्या कल्पक उपाय योजनांची दखल घेत हा सन्मान जाहीर झाला आहे. गेट्स फाऊंडेशन दरवर्षी गोलकिपर्स इव्हेंट हा कार्यक्रम आयोजित करते. २०४५ पर्यंत जगभरातील लाखो बालकांचे जीव वाचवण्याचा संकल्प या गोलकिपर्स इव्हेंटमध्ये बिल गेट्स यांनी जाहीर केला. 

बिल गेट्स म्हणाले, “२०४५ पर्यंत जगभरातील लाखो बालमृत्यू रोखण्याची आणि त्यासाठी जबाबदार असणाऱ्या काही जीवघेण्या आजारांना नष्ट करण्याची फार मोठी जबाबदारी आहे आणि मानवता एका महत्त्वाच्या वळणावर आहे.” ते म्हणाले, “आरोग्य सुविधांसाठीच्या निधीत कपात करणे स्वीकारायचे की मुलांना त्यांचा अधिकार असणारे चांगले आयुष्य द्यायचे, यावर आपण पुढील पिढीसाठी काय भवितव्य योजतो ते ठरणार आहे.”

२००० मध्ये जगभरात १० लाख बालमृत्यू होत असत, आता हे प्रमाण ५ लाखांवर आले आहे. याला फार मोठे यश मानले जाते. पण आरोग्य सुविधांवरील निधीत कपात झाली तर प्रगतीचे हे चक्र उलट फिरू शकते. “लोकांच्या कल्पनेपेक्षा मुलांच्या आरोग्याची आताची स्थिती बिकट आहे. पण आपण विचार करतो, त्यापेक्षा भवितव्य चांगले असणार आहे,” असे ते म्हणाले. 

डॉ. अभय बंग यांच्या ७५व्या वाढदिवशी पुरस्कार

डॉ. अभय बंग यांचा ७५ वा वाढदिवस २३ सप्टेंबरला मंगळवारी साजरा झाला. योगायोगाने याच दिवशी हा जागतिक सन्मान देण्यात आला आहे. ‘सर्च’संस्थेने बालकांना न्यूमोनियासाठीचा उपचार आणि नवजात बालकांची काळजी घेण्यासाठी खेड्यातील स्त्रियांना प्रशिक्षत करण्याचे कार्यक्रम सुरू केला. यामुळे अर्भक मृत्यूदर १२१वरून १६ इतका खाली आणता आला. भारत सरकारने हाच उपक्रम ‘आशा’च्या रूपाने २००५ला सुरू केला. आता दरवर्षी देशभरातली १० लाखांवर आशा सेविका दीड कोटी नवजात बालकांना आऱोग्यसुविधा पुरवतात. डॉ. बंग यांची ही पद्धती जगभरातील ८० देशांत स्वीकारली गेली आहे. 

 

▪️पुरस्कार प्राप्त इतर व्यक्ती अशा

१. डेव्हिड बेकहॅम (इंग्लंड) – मुलांचे आरोग्य आणि शिक्षण

२. क्रिस्टल म्वेसिगा बिरुंगी (युगांडा) – तरुणांचे आरोग्य धोरण

३. टोनी गार्न (जर्मनी) – मुलींचे शिक्षण आणि आरोग्या

४. जॉन ग्रीन (अमेरिका) – तरुणांतील टीबी आणि मानसिक आरोग्यावर संवाद

५. ओसास इघोडारो (नायजेरिया) – मलेरियाविरोधात जनजागृती

६. डॉ. डोनाल्ड कबेरुका (रवांडा) – जागतिक आरोग्य वित्त

७. जेरोप लिमो (केनिया) – एचआयव्ही जनजागृती

८. रीम अल हशिमी (यूएई) – आरोग्य आणि शिक्षण यातील गुंतवणूक

९. डॉ. नवीन ठाकेर (भारत) – बालआरोग्यासाठी सामूदायिक प्रयत्न

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes