कूर येथे कालव्यात ट्रॅक्टर पडून चालक ठार
schedule24 Dec 24 person by visibility 190 categoryगुन्हे
कोल्हापूर : कूर (ता. भुदरगड) येथे ऊस वाहतुक करणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने कालव्यात पडून चालकाचा जागीच मृत्यू झाला. विशाल बबन शिंदे (वय ३५, रा. व्हनगुत्ती, श्रीनगर, ता. भुदरगड) असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि.२३) मध्यरात्री घडली. घटनेची नोंद भुदरगड पोलिसांत झाली आहे.
सोमवारी मध्यरात्री गारगोटी - कोल्हापूर राज्य मार्गावर कूर नजीक दुधगंगा उजव्या कालव्याच्या पुलावर चालक विशाल शिंदे याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी पंचनामा करत मृत चालक शिंदेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. अधिक तपास भुदरगड पोलिस करत आहेत.