केआयटी चा शाहू माने राष्ट्रीय विजेता ; राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक
schedule25 Dec 24 person by visibility 147 categoryक्रीडा
कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थी शाहू माने याने ६७ व्या राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेच्या १० मीटर एअर रायफल या क्रीडा प्रकारामध्ये खुल्या गटात सुवर्णपदक जिंकून राष्ट्रीय अजिंक्यपद मिळवले आहे. पात्रता फेरीमध्ये द्वितीय स्थानावर असणाऱ्या शाहू माने यांनी अंतिम फेरीमध्ये विलक्षण कामगिरी करत जेते पदावर स्वतःच्या नावाची मोहर उमटवली आहे.
संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी, विभाग प्रमुख डॉ.उदय भापकर, संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले,खेळ विभागाचे प्रमुख विजय रोकडे यांचे मोठे प्रोत्साहन लाभले आहे.
केआयटी शाहू माने व त्याच्यासारख्या सारख्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना सतत सर्व प्रकारचे सहकार्य करत आलेली आहे. केआयटी च्या विद्यार्थ्यांनी पॅरालिम्पिक स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे.अशा खेळाडूंना शैक्षणिक शुल्कामध्ये मोठी सवलत संस्थेने दिली आहे.- डॉ.मोहन वनरोट्टी,संचालक केआयटी.
शाहूच्या या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशामध्ये तो शिकत असलेल्या केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मोठा पाठिंबा आहे.त्याच्या विभागातील सर्व शिक्षक विभाग प्रमुख संचालक सर्व विश्वस्त यांचे सतत मोठे प्रोत्साहन शाहूला मिळाले आहे- सौ.आशा माने (शाहू माने यांची आई ).