कोल्हापूर महानगरपालिका : टिप्पर चालकांचे फाळणी पुस्तक गहाळ हा तर स्कॅम 2024; 'आप'चा आरोप
schedule24 Dec 24 person by visibility 292 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : टिप्पर चालकांचे फाळणी पुस्तक गहाळ. हा तर स्कॅम 2024 असा आरोप आपने केला. टिप्पर चालक कंत्राट घोटाळ्यावर चर्चा करण्यासाठी आज अतिरिक्त आयुक्त रोकडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, सीएसआय पवार यांच्या उपस्थितीत बैठक महानगरपालिकेत पार पडली. चर्चेत प्रशासकांना वस्तुस्थिती अहवाल देण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त यांनी दिले.
दरम्यान बैठकीमध्ये संबंधित 6 कंत्राटदारांना यापूर्वी दोन नोटीस काढून सर्व रेकॉर्ड सादर करण्यास सांगितले. परंतु त्यांनी अपुरे रेकॉर्ड सादर केले गेल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.
आप ने फाळणी पुस्तक व हजेरी वही मध्ये तफावत निदर्शनास आणून दिली. प्रत्यक्ष 180 ते 190 चालक उपस्थित असताना 254 चालकांचे पगार उचलले.
एप्रिल ते नोव्हेंबर पर्यंतच्या नोंदी तपासण्यासाठी या बैठकीस फाळणी पुस्तक घेऊन येण्यास सांगितले होते. परंतु अधिकारी, कर्मचारी पुस्तक घेऊन आले नाहीत. अतिरिक्त आयुक्त यांनी सहाय्यक आयुक्तांना फाळणी पुस्तक ताब्यात घेण्यास सांगितले. त्यांनी CSI यांना पुस्तक आणण्यास सांगितले. मुकादम संग्राम यांनी केएमटी वर्कशॉप, सर्व कंत्राटदार यांचे ऑफिस, संबंधित कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली परंतु पुस्तक सापडले नाही.
त्यामुळे टिप्पर चालकांच्या रोजच्या कामाची नोंद असणारे फाळणी पुस्तक गहाळ झाल्याचे स्पष्ट झाले. रात्री उशिरापर्यंत शोधण्याचे काम सुरु होते.
प्रशासकांच्या समोर वस्तुस्थिती अहवाल सादर करणार असल्याचे सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी सांगितले. चुकीचे रेकॉर्ड सादर करणेपी एफ, ESIC, बँक स्टेटमेंट जमा न करणे, महिन्याचा पगार सात तारखेपर्यंत न करणे, सही केले हजेरी मस्टर महापालिकेला जमा न करणे, महापालिकेची फसवणूक करून 254 चालकांचे बिल उचलणे हे मुद्दे चौकशी अहवालात घ्यावेत अशी मागणी आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, विजय हेगडे, मयुर भोसले, आदी उपस्थित होते.