SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बाल वारकऱ्यांसमवेत दिंडीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचा सहभागगोकुळच्या कर्मचाऱ्यांनी ठराव बदलण्याच्या हालचाली करू नयेत : उदय शिंदे यांचे आवाहनआषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटपकसबा बावड्यात १४० चिमुकल्या वारकऱ्यांचा सहभाग; पर्यावरणपूरक आषाढी वारी उत्साहात आरोग्य सेवा आयुक्त काटकर यांची गारगोटी उपजिल्हा रुग्णालयास भेट; विभागीय आढावा बैठक संपन्नधर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामापंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजापेपरफुटी विरोधात कोल्हापुरात आज शनिवारी काँग्रेसचे धरणे आंदोलन व कॅन्डल मार्चपाऊलखुणा न्यायाच्या आणि समानतेच्या: ‘आंतरराष्ट्रीय लाल शू दिवस’नीट पेपर लीक: केंद्र सरकारची कठोर कारवाई; एनटीएच्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी

जाहिरात

 

कसबा बावड्यात १४० चिमुकल्या वारकऱ्यांचा सहभाग; पर्यावरणपूरक आषाढी वारी उत्साहात

schedule25 Jul 26 person by visibility 158 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : आषाढ महिन्याच्या पवित्र पर्वावर मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. १, कसबा बावडा येथे "प्लास्टिकमुक्त व पर्यावरणपूरक आषाढी वारी" सोहळा भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. या सोहळ्यात १४० चिमुकल्या वारकऱ्यांनी सहभाग घेऊन परिसरात पंढरीचा अनुभव निर्माण केला.

दिंडीचे उद्घाटन सचिन चौगले आणि सुनंदा चौगले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रकरणी शाळा परिवारातर्फे स्वागत करण्यात आले. तब्बल १४० विद्यार्थी विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेत, कपाळी गंध आणि गळ्यात तुळशीमाळ घालून सहभागी झाले होते. टाळ-मृदुंगाचा गजर, अभंगांच्या सुरेल धून आणि "ज्ञानोबा-तुकाराम" च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

शाळेपासून सुरू झालेली ही दिंडी भगतसिंग वसाहत, यशवंत कॉलनी, कृष्णानंद कॉलनी, ठोंबरे मळा मार्fat विठ्ठल मंदिरापर्यंत पोहोचली. या मार्गात पालखीचे दर्शन, विद्यार्थिनींच्या फुगड्या आणि पालकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला.

या सोहळ्याला महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. लहान वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांना केळी आणि पौष्टिक राजगिरा लाडू वाटप करण्यात आले. मुलांमध्ये संस्कार आणि पर्यावरणप्रेम रुजवण्याचे हे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.


कापडी पिशव्या, कागदी झेंडे आणि पानांचा वापर करत ही वारी पूर्णपणे प्लास्टिकमुक्त ठेवण्यात आली. लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि वारकरी परंपरेचे संस्कार रुजवण्याचा हा एक यशस्वी प्रयत्न ठरला.
डॉ. अजितकुमार पाटील आणि उत्तम कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

 विद्या पाटील, उत्तम पाटील, अमित पोटकुले, आर. जी. कीर्तीकर, दीपाली भापकर, नेमिस्टे, बालवाडी मुख्याध्यापिका कल्पना पाटील, सावित्री काळे, शाळा व्यवस्थापन समिती, प्रभुदास दाभाडे, राहुल आळवेकर, विशाल चव्हाण तसेच परिसरातील पालक आणि मान्यवर या सोहळ्यात सहभागी झाले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes