कोल्हापुरात ईद फेस्टिवल 2025 चे उद्घाटन 25 मार्च रोजी
schedule23 Mar 25 person by visibility 481 categoryसामाजिक

कोल्हापूरः प्रतिवर्षी प्रमाणे ईद फेस्टिवल बिंदू चौक कोल्हापूर 25 मार्च 2025 रोजी सायं. ठीक 5 :30 वा. फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. महिलांची मोठी गर्दी लक्षात घेता व हैदराबाद दिल्ली मुंबई या ठिकाणी येणाऱ्या नवीन नवीन महिलांच्या सौंदर्य वस्तूंचं साहित्य यावेळी आकर्षण राहणार आहे. महिलांकरिता अक्कमहादेवी मंडप येथे वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. ना नफा ना तोटा या धर्तीवर गेली सत्तावीस वर्षे ईद फेस्टिवलचे आयोजन केले जात आहे.
ईद फेस्टिव्हलचे उद्घाटन हाजी बादशाह बाबुभाई बागवान मुस्लिम समाजातील जेष्ठ (शुगर फैक्टरी चीफ केमिस्ट) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षपद जयेशभाई कदम (महाभारत ग्रुप) हे भूषविणार आहेत. कार्यक्रमास माजी महापौर श्रीमती हसीना फरास. माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी सभापती स्थायी समिती शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण अध्यक्ष काँग्रेस पार्टी, आदिल फरास अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, माजी महापौर आर. के. पोवार, संजय कदम उद्योगपती, माजी उपमहापौर हरिदास सोनवणे, माजी उपमहापौर अर्जुन माने, मुस्लिम बोर्डिंग प्रशासक कादर मलबारी, ईश्वर परमार राजु यादव विनायक फाळके, जितू सलगर, रियाज सुभेदार सामाजिक कार्यकर्ते, सलीम शेख (अॅक्सेस कॉम्प्युटर) हाजी जहांगीर अत्तार, माजी नगसेवक जितू सलगर रफिक शेख चेअरमन, नेहरु हायस्कूल, मलिक बागवान चेअरमन, अँग्लो उर्दू हायस्कूल, शिरोली (पु.), मुस्लिम बोर्डिंग संचालक हाजी पापाभाई बागवान, हाजी फारुक पटवेगार, अल्ताफ झांजी, हाजी लियाकत मुजावर, रफिक मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब मुल्ला, शकील नगारजी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ईद फेस्टिव्हल संस्थापक गणी आजरेकर, संयोजक समिती-समीर बागवान, जब्बार देसाई, रहिम महात, राजू अत्तार, अदिल अत्तार, शकील अत्तार, हमीद बागवान, मुस्ताक ताशिलदार. अब्दुलहमीद मिरशिकारी, निलेश भोसले, जमील बागवान, राजू जमादार, सिद्धेश गवळी, मुस्तफा मणेर, शिक्षा शेख, शकील कोतवाल. आदी ईद फेस्टिवलसाठी कार्यरत आहेत. ईद फेस्टिवलची तयारी अंतिम टप्प्यात असून काही मोजकेच स्टॉल उपलब्ध आहेत .