SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पहलगाम दहशतवादी हल्ला: सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा, दहशतवादाविरुद्ध देश एकजूट महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखलमहर्षी वि.रा. शिंदे क्रांतीकारी लोकोत्तर व्यक्तीमत्त्व: राजन गवस; प्रा. एन.डी. पाटील लिखित महर्षींवरील पुस्तकाचे विद्यापीठात प्रकाशनसांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी नवीन साठवण तलाव बांधावेत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मित्रच्या नियामक मंडळाची दुसरी बैठककोल्हापूर विभागीय माहिती उपसंचालक पदाचा प्रवीण टाके यांनी स्विकारला पदभारपाणी पुरवठा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी उत्तम जाधव, तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र येळवडेराष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताह : कोल्हापुरात आरोग्य तपासणी शिबिराचा ६६ जोडप्यांनी घेतला लाभगावागावांतील तलावांचे होणार पुनरुज्जीवन; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याहस्ते ‘जलरथा’चे उद्घाटनइस्लामपुरातील कुख्यात गुंड नितीन पालकर याचा भर दुपारी खून कोल्हापुरातील शिवाजी पेठेत तरुणाचा खून

जाहिरात

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवारी रोजगार मेळावा

schedule07 Feb 25 person by visibility 307 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यात पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेला (PMNAM) अंतर्गत शिकाऊ उमेदवारी भरती तथा रोजगार मेळावा सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा रोड, कोल्हापूर येथे आयोजित केला आहे. 

या मेळाव्यास जिल्ह्यातील नामांकीत आस्थापना सहभागी होणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण व शिकाऊ उमेदवारी पूर्ण झालेले तसेच इतर पदवी व पदविकाधारक, बारावी पास, बारावी नापास उमेदवारांनी मार्कलिस्ट व आधारकार्ड घेवून मेळाव्यास उपस्थित रहावे, 

असे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम. एस. आवटे व  एम. आर. बहिरशेट, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, व्दारा राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes