इस्लामपुरातील कुख्यात गुंड नितीन पालकर याचा भर दुपारी खून
schedule24 Apr 25 person by visibility 497 categoryगुन्हे

इस्लामपूर : येथील कुविख्यात गुंड नितीन संजय पालकर (वय ३५ ) याचा दोन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केला. पालकर याच्या खूनामुळे शहरात खळबळ माजली आहे.
येथील वाळवा बझार जवळ असलेल्या एका पानटपरीसमोर नितीन पालकर याचा दोन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केला. गुरुवारी (दि.२४) भरदिवसा येथील वाळवा बझारसमोर घडलेल्या या थरारक घटनेने शहरात एकच खळबळ माजली आहे. पालकर याच्यावर खून, खूनाचे प्रयत्न, खंडणी, हाणामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला मोक्काही लावण्यात आला आहे. तो सध्या जामिनावर बाहेर होता.
पालकर याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल झाले. हल्लेखोरांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.