पर्यावरण पूरक रक्षाबंधन
schedule10 Aug 25 person by visibility 156 categoryसामाजिक

कोल्हापूर : पर्यावरण पूरक रक्षाबंधन भरारी सामाजिक संस्था नेसरी, महा एनजीओ फेडरेशन यांच्यावतीने दि. 9 ऑगस्ट रोजी नेसरी पोलीस ठाणे येथे कार्यक्रम आयोजित केला होता.
रक्षाबंधनाला राखीपासून भावाला मिळणार पर्यावरण पूरक गोमय रक्षा सूत्र आणि गौ मातेचा आशीर्वाद महा एनजीओ फेडरेशनच्या अभिनव उपक्रम पर्यावरणपूरक रक्षा सूत्रामुळे प्रदूषण टाळण्या बरोबरच बहीण-भावाच्या हळुवार नात्याचा अंकुर आता प्रत्यक्ष गौ मातेच्या आशीर्वादानेच अंकुरणार आहे. महाराष्ट्रभरातील सर्वच जिल्ह्यातील सामाजिक स्वयंसेवी संस्था ज्या महिला पदाधिकारी चालवतात अशा १०० संस्थांना एनजीओना महा . पर्यावरण रक्षणार्थ व त्याबाबतच्या प्रबोधनासाठी महा एनजीओ फेडरेशनने उचलेल्या या गोमय राखी उपक्रमाचे समाजातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.
या वर्षीही आम्ही गौमातेच्या पंचगव्यापासून रक्षा सूत्र बनविण्याचे आणि आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे सेवा कार्यही या माध्यमातून करीत असून महिलांना रोजगार ही उपलब्ध ही करून देत आहोत. महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या प्रेरणेने ही सेवा उपलब्ध होत आहे.
कार्यक्रमाला नेसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आबा गाढवे ,भरारी सामाजिक संस्थेचे सचिव दीपक नाईक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.