SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर हादरले: शिंगणापुरात नदीत बुडून ४ वर्षीय चिमुल्याचा दुर्दैवी मृत्यूफ्लिपकार्टमध्ये डीकेटीईच्या एमबीएच्या पंधरा विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी निवडशाहू विचारांचे भाष्यकार ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांना (मरणोपरांत) ४० वा 'राजर्षी शाहू पुरस्कार' जाहीरड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार:पालकमंत्री हसन मुश्रीफकोकण भवनात ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय सुरूखेत बचाव अभियान अंतर्गत कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे प्रशिक्षणखरीप हंगामासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देशकोल्हापुरात मोफत 'वॉटर रेस्क्यू' प्रशिक्षण: दिनकर कांबळे यांचा पुढाकारकोल्हापुरात 'इनर व्हील क्लब'तर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बसथांब्याचे लोकार्पणसुवर्णतुला: हिंदवी स्वराज्याच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात

जाहिरात

 

फ्लिपकार्टमध्ये डीकेटीईच्या एमबीएच्या पंधरा विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी निवड

schedule04 Jun 26 person by visibility 116 categoryशैक्षणिक

  इचलकरंजी : येथील डीकेटीई संस्थेतील एमबीए विभागाने प्लेसमेंट व उदयोगसहभाग क्षेत्रात उल्लेखन्नीय यश संपादन करीत देशातील अग्रगण्य ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या सप्लाय चेन मॅनेजमेंट विभागातील प्रतिष्ठीत सशुल्क इंटर्नशिपसाठी तब्बल १५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

  भारताच्या ई-कॉमर्स क्षेत्रात अग्रस्थानावर असलेल्या फ्लिपकार्टमध्ये विद्यार्थ्यांना लॉजिस्टिक्स, वेअरहाउस मॅनेजमेंट, इन्व्हेंटरी कंट्रोल, सप्लाय चेन ऑपरेशन्स आणि वितरण व्यवस्थापन यांसरख्या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे.

  फ्लिपकार्टने २५ विद्यार्थ्यांना पुणे येथे ट्रेनिंगसाठी बोलवले होते यामधून १५ विद्यार्थ्यांची निवड केली व एमबीए विभागातील श्रेया निरवाने, सायमा पटेकरी, सौरभ मगदूम,ॠषिकेश पाटील,पवन रावळ,हर्षवर्धन नगारे,संकेत शिंदे, मृणाल मुसळे, व्यंकटेश सोनटक्के, निकिता कुमावत, समिक्षा कुगे,भार्गवी गुरसाले, ऐश्‍वर्या चौगुले, भाव्या कासलीवाल व प्राची पाटील या विद्यार्थ्यांची फ्लिपकार्टने निवड केली आहे. या ट्रेनिंगचा फायदा भविष्यकाळात प्लेसमेंटसाठी होणार आहे.

  फ्लिपकार्टमध्ये डीकेटीईचे विद्यार्थी व्यवस्थापनावर काम करणार असून कंपनीच्या वतीने विविध विभागातील तज्ञ सदर विद्यार्थ्यांना या काळात मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांचे कार्यक्षमता व त्यांच्यातील कौशल्य वृत्तीची पडताळणी करुण त्यांना थेट नोकरीसाठी घेण्याचे संकेत दिले आहेत. फ्लिपकार्टसारख्या प्रतिष्ठीत कंपनीमध्ये एकाच वेळी १५ विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी निवड होणे ही संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची,प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाच्या प्रभावी कार्याची आणि विद्यार्थ्यांच्या मेहनत, जिदद व गुणवत्तेची साक्ष आहे. या यशाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख डॉ. पी.एस.जाधव, डॉ. व्ही.एस.गुरव, टीपीओ ए.एस.गणपते यांचे मार्गदर्शन लाभले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes