SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
लाल किल्ल्याच्या प्रांगणात रंगणार 'भारत पर्व 2026'प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रंगीत तालीमसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “रस्ता सुरक्षा” अभियानांतर्गत जाणीव जागृती मार्गदर्शन कार्यक्रमशाहू वस्तुसंग्रहालय खुले करा, ...अन्यथा शाहू जन्मस्थळ येथे सोमवारी शाहूप्रेमी कोल्हापूरकरांचा उपोषणाचा इशारापश्चिम विभागीय अन्वेषन संशोधन स्पर्धा २०२५ -२६ मध्ये शिवाजी विद्यापीठाचे यश हिंद-दी-चादर समागमात श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी भाविकांची महासागरासारखी गर्दी”डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे शुक्रवारपासून राष्ट्रीय कार्यशाळा'थेट बाजारपेठ व्यवस्थापन' मोफत प्रशिक्षण २७ जानेवारी पर्यंत नावनोंदणीची संधी शिवाजी विद्यापीठात ‘भारतीय विद्येचा परिचय’अभ्यासक्रम उत्साहातकवी होण्याची पूर्वअट म्हणजे माणूस होणे : अजय कांडर; विद्यापीठातील ‘कविकट्टा’ झाला काव्यमय!

जाहिरात

 

सरनोबतवाडीत गॅरेजना आग... सुमारे पस्तीस लाखाचे नुकसान

schedule22 Dec 25 person by visibility 277 categoryगुन्हे

कोल्हापूर - सरनोबतवाडी येथील आंबेडकरनगर परिसरात असणाऱ्या  गॅरेजना आग लागली होती. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक आणि इतर साहित्य मिळून सुमारे 35 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

 सरनोबतवाडी येथील आंबेडकरनगर परिसरात असणाऱ्या  मनोहर सुतार, अकबर पठाण आणि वैभव जाधव या तिघांची एकमेकाला लागून ट्रक रिपेअरी, स्प्रे पेंटिंग आणि ट्रकच्या बॉडीचे काम करणारी तीन गॅरेज आहेत. आज सकाळी सुमारास या गॅरेज मधून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ याची वर्दी अग्निशामन दलाला दिली.

कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक आणि इतर साहित्य मिळून सुमारे 35 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes