SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदनमध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये ध्वजवंदन७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण घोडावत विद्यापीठात भूगोल दिन साजरा 'माय व्हिलेज माय मॅप' पोस्टर स्पर्धा यशस्वीमहाराष्ट्राच्या रूपाली कदम यांना 'जीवन रक्षा पदक' जाहीरपद्म पुरस्कार 2026 जाहीर : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण; महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा गौरवहिंद-दी-चादर समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी भाविकांची अलोट गर्दीमतदान संविधानाने दिलेला अमूल्य अधिकार : जिल्हाधिकारी अमोल येडगेकोल्हापूर जिल्ह्याला "पर्यटन हब" म्हणून अधिकृत दर्जा द्यावा : आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणीतखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन

schedule26 Jan 26 person by visibility 99 categoryसामाजिक

६३ वर्षांत प्रथमच महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन; घडला नवा इतिहास

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले आणि विद्यापीठाच्या ६३ वर्षांच्या वाटचालीत एक नवा इतिहास रचला गेला. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आल्याच्या या घटनेचे उपस्थित सर्वांनीच टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आणि औचित्य या निमित्ताने नव्याने अधोरेखित झाले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू व शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते पुणे विद्यापीठात ध्वजवंदन करण्यात येणार असल्याने प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते आज सकाळी ठीक आठ वाजता शिवाजी विद्यापीठात ध्वजवंदन करण्यात आले. विद्यापीठाच्या ६३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्याने शिवाजी विद्यापीठातील सर्वच घटकांना त्याचा मोठा आनंद व अभिमान वाटला. प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांचे उपस्थितांकडून टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले. डॉ. जाधव यांनी यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत छायाचित्र काढून घेण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोठी गर्दी झाली.

यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एन.सी.सी.) छात्रांनी संचलन करून ध्वजास मानवंदना दिली. विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीत सादर केले. ध्वजवंदनानंतर प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी गुरव, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, इनोव्हेशन व इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, सुरक्षा अधिकारी वसंत एकले, माजी अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes