तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
schedule25 Jan 26 person by visibility 81 categoryसामाजिक
नांदेड : तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दर्शन घेतले.
त्यांच्यासह आंध्रप्रदेश उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण, महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य चरणदीप सिंघ आदींनीही दर्शन घेतले.
गुरुद्वारा बोर्डाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी, मान्यवर यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांची प्रमुख उपस्थिती होती.