आता तरी.. निष्ठावंत कार्यकर्त्यांना महत्वाची पदे द्या... :भाजपच्या चंद्रे च्या संघनात्मक बैठकीत कार्यकर्त्याचा सूर
schedule18 Mar 25 person by visibility 247 categoryराजकीय

कसबा वाळवे : भारतीय जनता पार्टी, राधानगरीच्या वतीने कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांची चंद्रे येथे संघटनात्मक बैठक झाली. यावेळी केंद्र आणि राज्यात भाजपला बहूमतांनी सत्ता मिळाली आहे. कार्यकर्त्यांच्या परिश्रम व त्यागातून सत्ता मिळाली आहे. येणाऱ्या निवडणूका कार्यकर्त्यांना संधी देणाऱ्या आहेत. तसेच या सत्तेच्या काळात भाजपच्या कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेतील महत्वाच्या पदावर आणि अशासकीय समित्यांमध्ये संधी मिळालीच पाहिजे, विकासनिधी वैयक्तिक लाभार्थ्यांच्या कामांना प्राधान्य मिळावे. अश्या मागणीचा कार्यकर्त्यांच्या एकमुखी सूर निघाला.
या संघनात्मक बैठकीमध्ये पक्ष निरीक्षक म्हणून भाजपा कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव प्रभावळे
यांनी सक्रिय सभासद, बुथ समिती रचना याचा आढावा घेऊन नवीन मंडल अध्यक्ष निवडी संदर्भात माहिती सांगितली.
तालुकाध्यक्ष विलास रणदिवे म्हणाले , पक्ष सभासद नोंदणी आणि पक्षाने राबविलेल्या कार्यक्रमांमध्ये हा कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदार संघातून चांगली कामगिरी असल्याची प्रसंशा करत पुढील काळात येथील नेत्यांना योग्य पदांची संधी मिळेल तर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश पाटील,साताप्पा धनवडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जेष्ठ नेते सुधाकर गुरव,आर.डी.पाटील, के .टी.कासोटे, अशोक खोत,मधूकर निकम,चंद्रकांत भिऊंगडे, विनोद कुलकर्णी, बाळकृष्ण सुतार,शरद पाटील, उत्तम पाटील, अजित गिरीबुवा, संतोष भोगटे, सागर जरग,धनाजी पाडळकर, सुरेश बारड, बळवंत नरके, वैभव चौगले,आकाश पाटील, यांच्या सह बुथ प्रमुख, कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक स्वप्नील जरग यांनी केले तर आभार शरद पाटील यांनी मानले.