अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला; थोडक्यात बचावले
schedule04 Dec 24 person by visibility 242 categoryदेश
अमृतसर : शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर पंजाबमधील अमृतसरमध्ये हल्ला झाला. सुवर्ण मंदिरात त्याच्यावर गोळी झाडण्यात आली आहे. अमृतसरच्या सुवर्ण मंदिराजवळ ही घटना घडली आहे. सुखबीर सिंग बादल यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गोळीबाराचा आरोप असलेल्या नारायण सिंह चौधरीला पोलिसांनी अटक केली आहे. एडीसीपी हरपाल सिंह यांनी याला दुजोरा दिला आहे.
सुखबीर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजीनामा द्यावा, असे डॉ दलजित सिंग म्हणाले. तसेच याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे.
दलजित सिंग चीमा म्हणाले की, श्री अकाल तख्त साहिबने दिलेल्या धार्मिक शिक्षेसाठी ते श्री हरमंदिर साहिबला दरबारामध्ये आहेत. दोषी नारायण सिंग अगदी आरामात बादलजवळ आला आणि गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. गोळीबार करण्यात आला पण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडल्यामुळे नारायण सिंह यांचे लक्ष्य चुकले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लक्ष्य चुकवून त्याला नियंत्रित केले नसते तर काहीही होऊ शकले असते.