कृषी व कृषी संलग्न पदवी प्रवेशासाठी डी. वाय. पाटील कृषी संकुलात निशुल्क मार्गदर्शन
schedule17 Jul 26 person by visibility 205 categoryशैक्षणिक
▪️मोफत ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा
▪️२५ जुलै पर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया
कोल्हापूर : कृषी व कृषी संलग्न पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत अचूक मार्गदर्शन मिळावे यासाठी तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी आणि डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयात निशुल्क प्रवेशपूर्व मार्गदर्शन व ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील यांनी केले आहे.
कृषी व कृषी संलग्न पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला १० जुलै पासून सुरुवात झाली असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी २५ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील. विद्यार्थी व पालकांमध्ये प्रवेश प्रक्रियेबाबत कोणताही संभ्रम राहू नये या उद्देशाने ही विशेष सुविधा सुरू करण्यात आली आहे.
महाविद्यालयातील अनुभवी प्राध्यापक व प्रवेश समितीमार्फत विद्यार्थ्यांना पात्रता, अभ्यासक्रमाची निवड, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम तसेच संपूर्ण ऑनलाइन अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
आजच्या काळात कृषी आणि कृषी अभियांत्रिकी हे क्षेत्र करिअरसाठी अत्यंत आश्वासक बनले आहे. पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सरकारी आणि निमशासकीय संस्थांमध्ये विविध तांत्रिक व प्रशासकीय पदे मिळवण्याची मोठी संधी आहे. याव्यतिरिक्त नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्या, खत व बियाणे उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, सिंचन तंत्रज्ञान आणि बँकिंग क्षेत्रात तसेच स्वतःचा 'स्टार्टअप' किंवा कृषी आधारित व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्याना मोठी संधी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच कोल्हापूर व परिसरातील विद्यार्थ्यांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. एस. बी. पाटील यांनी केले आहे.
डी. वाय. पाटील कृषी संकुल तळसंदे येथे विद्यार्थिनींसाठी शासन नियमानुसार मोफत शिक्षण सुविधा उपलब्ध असून, सर्व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध शासकीय शिष्यवृत्ती योजनांचाही लाभ मिळतो. तसेच मुला-मुलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित व सुसज्ज वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे.
बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी) व बी.एस्सी. (कृषी) प्रवेशासंदर्भातील संपूर्ण माहिती, प्रवेशपूर्व मार्गदर्शन यासाठी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी डी. वाय. पाटील कृषी संकुल, तळसंदे येथे प्रत्यक्ष भेट देऊन या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ८८०६०८९५९९, ९३५६८०११८३ बी.टेक. अॅग्री, ७०६६९४४९५९ बी.एस्सी. अॅग्री या क्रमांकावर संपर्क साधावा