SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून कोल्हापुरात एनडीए परीक्षेचे केंद्र सुरू करावे, खासदार धनंजय महाडिक यांची मागणीगर्भलिंग निदान प्रकरणी डॉक्टरविरुद्ध कारवाई; वैद्यकीय नोंदणी निलंबनाची शिफारस‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजनकेडीसीसी बँकेकडे ११,१९८ शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे रु. ७४ कोटी जमापवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम नोंदविण्याचे आवाहनथोरला दवाखाना गोरगरिबांची आरोग्यदायीनी तर केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर शहराची अस्मिता; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भावनाराष्ट्रीय हातमाग दिन: भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा आणि अभिमानकोरे फार्मसीच्या बी. फार्म अभ्यासक्रमास 'अ' मानांकनउंचगाव, सरनोबतवाडी परिसरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस चौकी उभारा; शिवसेना आक्रमक!कोरे आर्किटेक्चरमध्ये आधुनिक थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

जाहिरात

 

कोल्हापूर महापालिकेच्यावतीने नाले सफाईतून 4875 टन गाळउठाव; नाले सफाईच्या कामाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

schedule13 May 24 person by visibility 598 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर महापालिकेच्यावतीने नाले सफाईतून 4875 टन गाळ 
कोल्हापूर : प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज दुपारी नालेसफाईच्या कामाची फिरती करून पाहणी केली. यावेळी त्यांनी जयंती पंपिंग स्टेशन, सुतार वाडा, गाडी अड्डा, रिलायन्स मॉल या चार ठिकाणी करण्यात आलेल्या नालेसफाईची पाहणी केली. याठिकाणी आरोग्य विभागामार्फत नाले सफाईची कामे चांगल्या प्रकारे झाले असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांना उर्वरीत नाले सफाई लवकरात लवकर पूर्ण करुन घेण्याच्या सूचना दिल्या. यासाठी आणखीन मशनरीची आवश्यकता भासल्यास त्या तातडीने घेण्याच्या सूचना दिल्या.

 नाले सफाई करुन आजअखेर 1029 इतका डंपर गाळ काढून तो उठाव करण्यात आलेला आहे. जयंती नाल्याची एकूण 17 किलोमीटर लांबीचा आहे. याममधील 10 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याचबरोबर गोमतीनाला 7.5 किलोमीटर लांबीचा असून यामधील 7 किलोमीटरचे काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित राहिलेला काम 30 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांना दिल्या. नाले सफाईतून आजअखेर सुतार वाडा या ठिकाणाहून 833 टन गाळ उठाव करण्यात आला आहे. तर रिलायन्स मॉल येथे 670 टन, गाडीअड्डा येथून 1524 टन, जयंती पंपिंग स्टेशन येथून 180 टन गाळ उठाव करण्यात आलेला आहे. तसेच वाय पी पवारनगर येथून 110 टन, मनोरा हॉटेल येथून 1483 टन गाळ उठाव करण्यात आलेला आहे. तर सुतारवाडा येथून 75 टन फ्लोटिंग मटेरियल उठाव करण्यात आलेले आहे. या सर्व ठिकाणचा आजअखेर 4875 टन गाळ काढून तो उठाव करण्यात आलेला आहे.

 यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, जल अभियंता हर्षजित घाडगे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, आरोग्य निरीक्षक स्वप्निल उलपे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes