कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.73 मिमी पावसाची नोंद; गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 32.3 मिमी पावसाची नोंद
schedule21 Aug 26 person by visibility 71 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यात मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 32.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 1 मिमी, शिरोळ – 0.3 मिमी, पन्हाळा- 1.6 मिमी, शाहुवाडी- 2.5 मिमी, राधानगरी- 6.2 मिमी, गगनबावडा- 32.3 मिमी, करवीर- 1.4 मिमी, कागल- 4.2 मिमी, गडहिंग्लज- 1.4 मिमी, भुदरगड- 2.8 मिमी, आजरा- 1.9 मिमी, चंदगड- 1.2 मिमी असा एकूण 4.73 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.
◼️कोल्हापूर जिल्ह्यातील 10 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात सुमारे 8.27 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार सिंचन तथा विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, कासारी नदीवरील- यवलूज व भोगावती नदीवरील- सरकारी कोगे व खडक कोगे असे एकूण 10 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (कंसात एकूण टक्केवारी )- राधानगरी 8.27 (99 टक्के), तुळशी 3.44 (99 टक्के), वारणा 32.73 (95 टक्के), दूधगंगा 24.72 (97 टक्के), कासारी 2.61 (94 टक्के), कडवी 2.52 (100 टक्के), कुंभी 2.61 (96 टक्के), पाटगाव 3.52 (95 टक्के), चिकोत्रा 1.26 (83 टक्के), चित्री 1.89 (100 टक्के), जंगमहट्टी 1.22 (100 टक्के), घटप्रभा 1.54 (100 टक्के), जांबरे 0.82 (100 टक्के), आंबेआहोळ 1.24 (100 टक्के), सर्फनाला 0.67 (100 टक्के), धामणी 1.29 (100 टक्के), कोदे ल.पा. 0.21 (100 टक्के) टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 18, सुर्वे 19.5, रुई 46.5, इचलकरंजी 45.1, तेरवाड 42, शिरोळ 33.6, नृसिंहवाडी 30.9 फूट इतकी पाणीपातळी आहे.