SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात मोठी कारवाई: ७ किलो अफू पावडरसह राजस्थानी इसम गजाआड; १ लाखाचा मुद्देमाल जप्तकृष्णा नदीपात्रात ७०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग; पाटबंधारे विभागाला आमदार यड्रावकर यांच्या सूचना गौरी-गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्ज; ३०० आयशर, ६५० हमालांसह अडीच हजारांहून अधिक कर्मचारी तैनातवारणा विद्यापीठाच्या कोरे अभियांत्रिकीत आंतरराष्ट्रीय विद्यार्थिनीचा प्रवेशआयएसटीई नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्यपदी डॉ. महादेव नरके यांची बिनविरोध निवडपाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची धडक मोहीम; महिनाभरात ५३ लाख ८२ हजाराची वसुली आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन: समान कामासाठी समान वेतन का गरजेचे?संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे (डे-बोर्डिंग) प्राचार्य अस्कर अली यांना ‘प्रिन्सिपल ऑफ द इयर’ पुरस्कारडी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत; महाविद्यालयात यंदाही १०० टक्के प्रवेशईएसआयसी लाभापासून एकही कामगार वंचित राहता कामा नये : पालकमंत्री प्रकाश आबिटकर; २ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात १०० टक्के नोंदणीसाठी मोहीम

जाहिरात

 

कोल्हापुरात मोठी कारवाई: ७ किलो अफू पावडरसह राजस्थानी इसम गजाआड; १ लाखाचा मुद्देमाल जप्त

schedule18 Sep 26 person by visibility 34 categoryगुन्हे

कोल्हापूर : सध्या महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात 'नशामुक्त भारत अभियान' वेगाने राबवले जात आहे. या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  नीलोत्पल (भा.पो.से.) यांनी अवैध अंमली पदार्थांचा साठा व विक्री करणाऱ्या तस्करांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत कणेरीवाडी येथे ७ किलो अफूच्या पावडरसह एका राजस्थानी इसमाला गजाआड केले आहे.
पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक  जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी विशेष पथके स्थापन केली होती. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथक कणेरीवाडी परिसरात गस्त घालत असताना, पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांना एका बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की, कणेरीवाडी येथील बालाजीनगर परिसरातील एका इमारतीत एक इसम अफूची पावडर तयार करून त्याची विक्री करत आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास कणेरीवाडी येथील बालाजीनगरमधील एका आर.सी.सी. इमारतीच्या वरील खोलीवर अचानक छापा टाकला.

 या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपी सागरराम भागीरथराम डारा (वय ३०, धंदा: ट्रान्सपोर्ट, सध्या रा. बालाजीनगर, कणेरीवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर, मूळ रा. आटीया, ता. भुपालगड, जि. जोधपुर, राजस्थान) यास ताब्यात घेतले. त्याच्या खोलीची झडती घेतली असता, तिथे सुमारे ७ किलो ग्रॅम वजनाची अफूची तयार पावडर आणि इतर साहित्य, असा एकूण १,००,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला.

पोलिसांनी पंचांसमक्ष कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गोकुळशीरगाव पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीने हा अफूचा साठा कोठून आणि कोणाकडून आणला होता, याबाबतचा सखोल तपास सध्या गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.

सदरची ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक  नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अन्նसासाहेब जाधव, व उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, आणि पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, अरविंद पाटील, अशोक पोवार, सतीश सूर्यवंशी व संजय हुंबे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes