SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
लहान मासे पकडून खरेदी विक्री केल्यास दंडात्मक कारवाईजलजीवन मिशन कोल्हापूर जिल्हयात शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी उर्वरीत ६७ गावांना निधी द्यावा, खासदार धनंजय महाडिक यांचं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना निवेदन"चंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभभाजपा संघटन पर्व अभियानांतर्गत आढावा बैठक उत्साहात संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात आजी- माजी विद्यार्थी व पालक मेळावाजनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याची तयारी ठेवा; काँग्रेसचे कोल्हापूर निरीक्षक संजय बालगुडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहनविद्यापीठाच्या क्रिकेट मैदानासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून एक लाखाचा निधीडीकेटीईच्या मुलांचा खो खो संघ राष्ट्रीय स्तरावरील सीओईपी, पुणे येथील स्पर्धेत विजयीक.वाळवेच्या शितल भांदिगरे यांची म्‍हैस तर माणकापूरचे प्रफुल्ल माळी यांची गाय प्रथम कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी समीर देशपांडे

जाहिरात

 

जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (जीपीए)ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत; अध्यक्षपदी डॉ. वर्षा पाटील, सचिवपदी डॉ.राजेश सोनवणे, खजानिसपदी डॉ. दीपक पवार

schedule24 Mar 25 person by visibility 465 categoryआरोग्य

कोल्हापूर : जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (जीपीए) २०२५ /२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा ही के. एम. ए हाऊस बेलबाग येथे रविवार दिनांक २३ मार्च २०२५ रोजी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. महादेव जोगदंडे यांनी २०२४/२५ चा सचिव अहवाल सादर केला, तर डॉ.गुणाजी नलवडे यांनी खजानिस लेखाजोखा अहवाल सांगितला. मावळते अध्यक्ष डॉ. अरुण धुमाळे यांनी वर्षभराच्या कामगिरीविषयी आढावा मांडला. त्यानंतर निवड समितीच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी पार्टे यांनी नवीन कार्यकारिणी घोषित केली. 
यावेळी डॉ.वर्षा पाटील यांची २०२५/२६ या एक वर्ष कालावधीसाठी अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. मावळते अध्यक्ष डॉ.अरुण धुमाळे यांनी त्यांना अध्यक्षीय खुर्चीवर स्थानापन्न होऊन पदग्रहण केले. पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये सचिवपदी डॉ.राजेश सोनवणे, खजानिस पदी डॉ. दीपक पवार यांची नेमणूक करण्यात आली. उर्वरित कार्यकारणी खालील प्रमाणे डॉ. शिवराज जितकर, डॉ. विनायक शिंदे, डॉ.गुणाजी नलवडे, डॉ.महादेव जोगदंडे, डॉ. उषा निंबाळकर,डॉ.प्रशांत खुटाळे, डॉ. शशिकांत पाटील, डॉ. विनायक कवठेकर, डॉ. सुधाकर ढेकळे,माजी अध्यक्ष डॉ.अरुण धुमाळे,तज्ञ सल्लागार संचालक पदी डॉ. शुभांगी पार्टे,डॉ. रमेश जाधव,डॉ. शिवाजी मगदूम. संस्थापक अध्यक्ष डॉ.विनोद घोटगे.   
       यावेळी सभेला डॉ. उद्यम वोरा, डॉ विलास महाजन, डॉ. शिवराज देसाई, डॉ. शीतल पाटील, डॉ. चंद्रकांत सोनवणे, डॉ. किशोर निंबाळकर, डॉ. हरीश नांगरे, डॉ. राजेश सातपुते तसेच अनेक आजीवन सभासद उपस्थित होते. नूतन सचिव डॉ. राजेश सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes