SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गॅस टंचाईला चाप! पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्यभर 'कंट्रोल रूम' सज्जसीपीआर रुग्णालयातील काही विभागांचे तात्पुरते स्थलांतरसंत एकनाथ सहकारी साखर कारखान्यातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी सुरू : सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलशिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहातडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्याचे यूपीएससीमध्ये यशजीवनात येणाऱ्या बदलासह स्वतःला तयार करा : संग्राम पाटील; डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये बक्षीस वितरण गडहिंग्लज-आजरा 'बायपास'साठी धनंजय महाडिक संसदेत कडाडले; वाढत्या अपघातांकडे वेधले लक्ष!‘गोकुळ’ मार्फत महाराष्ट्राचे शिल्पकार स्‍व. यशवंतराव चव्‍हाण यांना अभिवादन ...परिवहन समितीचे नूतन सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर; केएमटी स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावेसुधारित आकृतीबंध आणि फेरीवाला समितीच्या मुद्द्यावरून काँग्रेस-शिवसेना (उबाठा) आक्रमक; आजपासून महापालिकेसमोर लाक्षणिक साखळी उपोषण!

जाहिरात

 

गोकुळचे दूध व दूधजन्य पदार्थ सौंदत्ती येथे भाविकांसाठी उपलब्ध

schedule11 Dec 24 person by visibility 456 categoryउद्योग

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रे निमिताने गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ घेवून जाणाऱ्या गाडीचे पूजन  गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते ओढ्यावरील रेणुका मंदिर, कोल्हापूर येथे करण्यात आले व त्यानंतर गाडी सौंदत्ती येथे रवाना करण्यात आली.

 बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा ११ डिसेंबर २०२४ ते १५ डिसेंबर २०२४ इ. रोजी होत असून महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून लाखो भाविक जात असतात यामध्ये कोल्हापूर व ग्रामीण भागातून जाणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय असते. सौंदत्ती येथे यात्रा काळात पूजा अर्चा, चहा पाणी, नैवेद्यासाठी गोडधोड प्रसाद हे नित्यनेमाचे कार्यक्रम होत असतात. यासाठी  गुणवत्तापूर्ण दूध व दुग्धजन्य पदार्थाची आवश्यकता असते. यासाठी गेली दोन वर्षे गोकुळमार्फत यात्रेकरूनच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत सौंदत्ती येथे गोकुळचे दूध व दूधजन्य पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत. त्याला भरगोस प्रतिसाद मिळाला असून या वर्षीच्या यात्रेमध्ये हि गोकुळची दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देत असल्याचे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.

गोकुळने सौंदत्ती येथे भाविकांसाठी आमच्या मागणीनुसार गुणवत्तापूर्ण  दूध, श्रीखंड, बासुंदी, लस्सी, दही,ताक, तूप, दूध पावडर असे दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध केलेबद्दल भाविकांच्यावतीने गोकुळ परिवाराचे आभार व्यक्त केले.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील, संभाजी पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, मार्केटिंग अधिकारी हनमंत पाटील  लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त मंडळ अध्यक्ष सौ.अनिता पोवार, सुरेश बिरबोळे, विजय पाटील, कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना अध्यक्ष अशोकराव जाधव, सुभाष जाधव, दयानंद घबाडे, अच्युतराव साळोखे, तानाजी चव्हाण, मोहन साळोखे, किरण मोरे, प्रशांत खाडे, श्रीकांत कारंडे, संजय मांगलेकर, उदय पाटील, बाबुराव पाटील, कृष्णात सुतार, शिवाजी देवकर, प्रदीप साळोखे, संघटनेचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes