SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
लहान मासे पकडून खरेदी विक्री केल्यास दंडात्मक कारवाईजलजीवन मिशन कोल्हापूर जिल्हयात शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी उर्वरीत ६७ गावांना निधी द्यावा, खासदार धनंजय महाडिक यांचं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना निवेदन"चंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभभाजपा संघटन पर्व अभियानांतर्गत आढावा बैठक उत्साहात संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात आजी- माजी विद्यार्थी व पालक मेळावाजनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याची तयारी ठेवा; काँग्रेसचे कोल्हापूर निरीक्षक संजय बालगुडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहनविद्यापीठाच्या क्रिकेट मैदानासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून एक लाखाचा निधीडीकेटीईच्या मुलांचा खो खो संघ राष्ट्रीय स्तरावरील सीओईपी, पुणे येथील स्पर्धेत विजयीक.वाळवेच्या शितल भांदिगरे यांची म्‍हैस तर माणकापूरचे प्रफुल्ल माळी यांची गाय प्रथम कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी समीर देशपांडे

जाहिरात

 

रमजान ईद दिनी २३ लाख ६३ हजार लिटर दूध विक्रीचा ‘गोकुळ’ चा उच्चांक; चेअरमन अरुण डोंगळे यांचा कर्मचाऱ्यांकडून सत्कार

schedule31 Mar 25 person by visibility 252 categoryउद्योग

कोल्हापूर : गोकुळने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे. उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद दिनी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून यादिवशी २३ लाख ६३ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील एका दिवसात झालेली हि सर्वाधिक दूध विक्री आहे. या रेकॉर्ड ब्रेक दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेअरमन डोंगळे यांनी भविष्यात प्रतिदिन २५ लाख लिटर दूध विक्रीचे ध्येय, दूध उत्‍पादक व ग्राहकांच्‍या विश्‍वासाहर्ततेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून साध्‍य करू असा विश्वास व्यक्त केला.

   पुढे बोलताना चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळने उत्‍पादक व ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जास्‍तीत जास्‍त लाभ करून देण्‍यासाठी नेहमीच प्राधान्यक्रम दिला आहे. याचे फलित म्हणून गोकुळच्‍या दररोजच्‍या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्‍याने वाढ होत आहे. रमजान ईद या दिवशी गोकुळच्या इतिहासातील एका दिवसाच्‍या दूध विक्रीचा नवीन उच्‍चांक प्रस्थापित झाला. रमजान ईद हा मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण. या दिवशी गोडधोड  करण्यासाठी दुधाला मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी असते. यावेळी २३ लाख ६३ हजार १७० लिटर्स इतकी दूध विक्री एक दिवसात झाली. गेल्यावर्षी रमजान ईदला २२ लाख ०१ हजार २४३ लिटर्स दूध विक्री झाली होती. यंदा त्यामध्ये १ लाख ६१ हजार ९२७ लिटर्सची वाढ झाली. तसेच काल झालेल्या गुढीपाडव्यानिमित्य १७ लाख लिटर्स दूध विक्री तसेच श्रीखंड व बासुंदी विक्री मध्ये उच्चांकी वाढ झाली.

  “गोकुळने दूध विक्रीमध्ये नवीन मानदंड निर्माण केला असून गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे. या यशामध्‍ये गोकुळचे दूध उत्‍पादक, ग्राहक, वितरक, दूध संस्था, कर्मचारी, अधिकारी व वाहतूक ठेकेदारांचे मोलाचे योगदान आहे. यामुळे ही सगळी मंडळी कौतुकास पात्र आहेत. म्‍हणून मी त्‍यांना संचालक मंडळाच्‍यावतीने धन्‍यवाद देतो.” असे चेअरमन डोंगळे यांनी स्‍पष्‍ट केले. तसेच रमजान ईद व श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक, वितरक, व संघाचे अधिकारी- कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

   यावेळी कार्यक्रमावेळी संघाचे संचालक अमरसिंह पाटील, प्रकाश पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांनी केले तर यांनी आभार पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ. प्रकाश साळुंके मानले. तसेच मार्केटिंग सहा.महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

  याप्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, सहा.महाव्यवस्थापक जगदीश पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ. प्रकाश साळुंके, संकलन सहा.व्‍यवस्‍थापक दतात्रय वाघरे, बी.आर.पाटील, उपेंद्र चव्हाण,  लक्ष्मण धनवडे, संग्राम मगदूम तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes