SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहाडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या रणवीर पाटीलला १३.३६ लाखांचे पॅकेजकोल्हापुरात होणार 'श्री राम कथा' आणि 'श्री राम यज्ञा'चे भव्य आयोजनपंजाबमध्ये 'डबल इंजिन' सरकारची गरज; नाभा मतदारसंघाच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध: जसविंदर सिंग नाभागोकुळ दूध संघ: ६४४ अपात्र संस्थांसाठी सतेज पाटील गट आता सर्किट बेंचमध्येप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलला संत सोपानकाका स्वच्छ, सुंदर व उपक्रमशील शाळा पुरस्कार निसर्गाच्या सानिध्यात एक हक्काचा दिवस: 'आंतरराष्ट्रीय पिकनिक दिवसपाणीपुरवठ्याच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी कोणताही हलगर्जीपणा करू नये : आ.राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचनाकोल्हापूर दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनातसिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाची 'NSI ब्रेन बायपास' कार्यशाळा यशस्वी

जाहिरात

 

कोल्हापुरात होणार 'श्री राम कथा' आणि 'श्री राम यज्ञा'चे भव्य आयोजन

schedule18 Jun 26 person by visibility 149 categoryसामाजिक

कोल्हापूर: अमृत महोत्सवी 'ब्राह्मण सभा करवीर' मंगलधामतर्फे कोल्हापुरात श्री राम कथा आणि श्री राम यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. 

 पुणे येथील निरूपण समर्थ भक्त श्री मकरंद बुवा सुमंत आपल्या रसाळ वाणीतून सुश्राव्य राम कथा सादर करणार आहेत, तर ह.भ.प. गोविंद मांडवगणे हे संहिता वाचन करणार आहेत.
हे कार्यक्रम २२ जून ते २८ जून या कालावधीत दररोज संध्याकाळी ४.०० ते ८.३० या वेळेत राम गणेश गडकरी हॉल, पद्यराजे गर्ल्स हायस्कूल, पेठाळा येथे संपन्न होणार आहेत. याबद्दलची माहिती 'ब्राह्मण सभा करवीर'चे अध्यक्ष डॉ. दीपक आंबेडकेर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 या संपूर्ण सप्ताहामध्ये २१ जून रोजी ग्रंथ दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, त्यानंतर विविध दिवशी रामायणातील प्रसंगांवर आधारित कथाकथन होणार आहे. २८ जून रोजी रावण वध आणि श्रीराम राज्याभिषेकानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच, २६ जून रोजी सकाळी नऊ वाजता मंगलधाम येथे श्रीराम यज्ञ होणार आहे. या धार्मिक पर्वात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन 'ब्राह्मण सभा करवीर'च्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

 या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष किरण धर्माधिकारी, कार्यवाह श्रीकांत लिमये, सहकार्यवाह श्रीमती अनुराधा गोसावी, खजिनदार  पूजा जोशी आणि व्यवस्थापक अशोक जोशी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes