SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ दूध संघ: ६४४ अपात्र संस्थांसाठी सतेज पाटील गट आता सर्किट बेंचमध्येप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलला संत सोपानकाका स्वच्छ, सुंदर व उपक्रमशील शाळा पुरस्कार निसर्गाच्या सानिध्यात एक हक्काचा दिवस: 'आंतरराष्ट्रीय पिकनिक दिवसपाणीपुरवठ्याच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी कोणताही हलगर्जीपणा करू नये : आ.राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचनाकोल्हापूर दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनातसिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाची 'NSI ब्रेन बायपास' कार्यशाळा यशस्वीडॉ. महादेव नरके यांचे पुस्तक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी दिशादर्शक : डॉ. संजय डी. पाटीलकोल्हापुरात २१ जून रोजी 'राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषद'बँकिंग प्रगतीत वसुली अधिकाऱ्यांचे योगदान मोलाचे: डॉ. सतीश घाळीपुण्यात गोकुळ दूध संघ संस्थाप्रतिनिधींकडून उपनिबंधक राजकुमार पाटील धारेवर

जाहिरात

 

गोकुळ दूध संघ: ६४४ अपात्र संस्थांसाठी सतेज पाटील गट आता सर्किट बेंचमध्ये

schedule18 Jun 26 person by visibility 177 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघातील ६४४ अपात्र ठरवण्यात आलेल्या दूध संस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी, आमदार सतेज पाटील गटाने आता कायदेशीर लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थांच्या पात्रतेबाबत सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी आता सतेज पाटील गट थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये धाव घेणार आहे.

गोकुळ दूध संघाच्या राजकारणात अपात्र संस्थांचा मुद्दा सध्या अत्यंत कळीचा ठरला आहे. या ६४४ संस्थांना मतदानाचा अधिकार मिळावा आणि त्यांचे सदस्यत्व कायम राहावे, यासाठी सतेज पाटील गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापूर्वीच्या कायदेशीर प्रक्रियेत दिलासा न मिळाल्याने, आता या गटाने उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडे दाद मागण्याचे निश्चित केले आहे.

या निर्णयामुळे गोकुळमधील सत्ताधारी गट आणि सतेज पाटील गट यांच्यातील संघर्ष अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत. दूध संस्थांच्या अस्तित्वाचा प्रश्न असलेल्या या प्रकरणात सर्किट बेंचचा निर्णय काय असेल, याकडे आता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes