गुढीपाडवा सर्वत्र उत्साहात साजरा; बाजारपेठेत मोठी उलाढाल
schedule30 Mar 25 person by visibility 126 categoryराज्य

कोल्हापूर: मराठी नववर्षदिन तथा गुढीपाडवा शहर आणि जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरामध्ये ही विधीवत गुढीचे पूजन करण्यात आले. कोल्हापूरमध्ये भव्य शोभायात्रा करवीर गर्जना तर्फे काढण्यात आली. तसेच याचबरोबर जिल्ह्यात अनेक भागात रा.स्व. संघाच्यावतीने पथसंचलन करण्यात आले. जिल्ह्यातही विविध ठिकाणी असेच कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बाजारपेठ सजल्या होत्या. विविध वस्तूंची खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली.
गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे, तो चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला येतो. या दिवशी घरोघरी गुढी उभारून, नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. कोल्हापूरमध्ये आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी गुढी उभारण्यात आली आहे.
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील बाजारपेठमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मध्ये उलाढाल दिसून आली यामध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वाहनाची खरेदी मोठ्या प्रमाणात झालेली दिसून आली.