SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर विभागात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनप्रजासत्ताक दिनी आरटीओ कोल्हापूरतर्फे हेल्मेट जनजागृती रॅली व रक्तदान शिबीर'जनगणना 2027' अंतर्गत पहिल्या टप्प्यातील गृहगणना व घरयादी कामकाजाचे वेळापत्रक आणि प्रश्नावली जाहीर; शासकीय अधिसूचना जारीपरिपूर्ण आणि जबाबदार नेतृत्व विकसित होणे गरजेचे: डॉ. विलास शिंदेडी.के.टी.ई. संस्थेच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकमध्ये ‘इंडिया टेक समिट २०२६’ दिमाखात संपन्न; गुगल जेमिनी टेक हबचा भव्य उपक्रम प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभारास जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना उपस्थित राहण्यासाठी आवाहनप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्याकडून पाच हजार रुपये दंड वसूलदावोस दौरा शंभर टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे सामंजस्य करार, ४३ लाख रोजगारनिर्मिती : उद्योगमंत्री डॉ.उदय सामंतभारतीय जनता पार्टीच्यावतीने गटनेता निवड प्रक्रिया पूर्णउल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 26 जानेवारीला शाळांमध्ये साक्षरता शपथ

जाहिरात

 

प्रजासत्ताक दिनी आरटीओ कोल्हापूरतर्फे हेल्मेट जनजागृती रॅली व रक्तदान शिबीर

schedule24 Jan 26 person by visibility 66 categoryराज्य

कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर व कोल्हापूर बाईकिंग कम्युनिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सर्व वाहनधारक, मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटना, वाहन वितरक संघटना, सर्व रिक्षा संघटना यांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत हेल्मेट जनजागृती व रक्तदान शिबीर सोमवार, 26 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी दिली आहे.

हेल्मेट जनजागृती रॅलीद्वारे वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करणे तसेच रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. या रॅलीस सर्वांनी हेल्मेट घालून उपस्थित रहावे तसेच रक्तदान करून या सामाजिक कार्यास सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes