SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ दूध संघ निवडणूक बाबत उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; निवडणूक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देशस्वातंत्र्यलढ्याची निर्भय सिंहनाद: अरुणा असफ अलीडॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागतनिवृत्त हवाई योद्ध्याने मिळविली शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी.विद्यार्थ्यांना त्रास देणे थांबवा, अन्यथा सीजेपी करेल मोठे आंदोलन"; अभिजीत दीपके यांचा अल्टीमेटमविना परवाना व्यवसायांवर कोल्हापूर महापालिकेची कारवाई ; एक लॉज सील व तीन आस्थापनांना समजकोल्हापूर : तावडे हॉटेल ते कावळा नाका चौक परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईथकीत घरफाळाधारकांवर सक्तीच्या कारवाईचे आयुक्तांचे आदेशशिरोळ नगरपरिषदेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना नगरपरिषदेत वर्ग करण्याचे आदेशराधानगरी भरले 93 टक्के; कोल्हापूर जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली

जाहिरात

 

गोकुळ दूध संघ निवडणूक बाबत उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; निवडणूक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश

schedule29 Jul 26 person by visibility 133 categoryउद्योग

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे आदेश मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी दिले होते. त्याची मुदत दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी संपत असून देखील शासनाने अद्याप कच्ची मतदार यादी प्रसिद्ध केली नाही. 

शासन जाणीवपूर्वक गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात होते त्यामुळे पुंगाव तालुका राधानगरी येथील स्वामी समर्थ सहकारी दूध व्यवसायिक संस्था यांनी माननीय उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर येथे याचिका दाखल केली होती. सदर याचिकेची सुनावणी आज दिनांक 29 जुलै 2026 रोजी झाली असून त्या कामी न्यायमूर्ती मिलिंद जाधव व न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांचे खंडपीठाने सदर याचिकेची दखल घेऊन मा. सर्वोच्च न्यायालय यांचे गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे आदेश असताना देखील शासनाने कच्ची मतदार यादी देखील अद्याप प्रसिद्ध न केल्याने नाराजी व्यक्त केली व शासनास व दुग्ध विभागास गोकुळ दूध संघाची निवडणूक तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले.

 सदर निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू न केल्यास मा. सर्वोच्च न्यायालय यांचे आदेशाचा अवमान केल्याबद्दल संबंधितांवर कायद्यातील तरतुदी अन्वये योग्य ती कारवाई केली जाईल असे आदेश दिले. सदर संस्थेचे वतीने ज्येष्ठविधीज्ञ श्रीनिवास पटवर्धन व एडवोकेट भूषण मंडलिक यांनी बाजू मांडली.

तसेच गोकुळ दूध संघाच्या सुनावणीमध्ये सरकार पक्षाच्या वतीने ॲड. श्रीमती तेजस कापरे यांनी काम पाहिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes