पहिल्या केन चेस सॉल्व्हिंग कपमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी; ६ विजेते घोषित
schedule14 Sep 26 person by visibility 107 categoryक्रीडा
कोल्हापूर : इचलकरंजी येथे वर्ल्ड फेडरेशन फॉर चेस कंपोझिशन (WFCC), चेसबेस इंडिया, केन चेस अकॅडमी आणि लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या केन चेस सॉल्व्हिंग कपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दोन्ही गटांत मिळून ३५ खेळाडू सहभागी झाले होते, ज्यामध्ये ५ वर्षांच्या निश्चय ऐतवडे (नांदेड) याने सर्वांचे लक्ष वेधले तसेच मुलींचा सहभागही उत्साही होता.
या स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे आहे:
- श्रेणी १ (Category 1) विजेते:
- प्रथम क्रमांक: अभय भोसले (जांभळी)
- संयुक्त द्वितीय क्रमांक: तन्मय पवार व अथर्व सुतार (इचलकरंजी)
- तृतीय क्रमांक: अथर्व तावरे (इचलकरंजी)
- श्रेणी २ (Category 2) विजेते:
- प्रथम क्रमांक: सुबोध कुलकर्णी (कोल्हापूर)
- द्वितीय क्रमांक: अर्णव वरुटे (इचलकरंजी)
सर्व विजेत्यांना बक्षीसे आणि सहभागी खेळाडूंना डब्ल्यूएफसीसीचे अध्यक्ष मारियन कोव्हासेविच व इव्हेंट डायरेक्टर शतानिक मुखुटी यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. खेळाडूंच्या या यशाबद्दल वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहित पोळ, रेश्मा नलवडे (केन चेस अकादमी), तसेच लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीचे पदाधिकारी कृष्णावतार भराडिया, अध्यक्षा रेखा सारडा, सचिव श्रद्धा सातपुते आणि कोषाध्यक्ष सुनिता अग्रवाल यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.