कोल्हापूर : भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.05 वाजता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.
ध्वजारोहणाच्या या मुख्य शासकीय सोहळ्यास जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,
असे आवाहनही जिल्हाधिकारी येडगे यांनी केले आहे.